Pimpri : बाळासाहेबांच्या शिवसेनेत आवक सुरुच; माजी नगरसेवकासह शंभरावर कार्यकर्त्यांचा झाला प्रवेश

Pimpri-Chinchwad : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होवून कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश..'
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad Sarkarnama

पिंपरी : बाळासाहेबांच्या शिवसेनेत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात इनकमिंग सुरुच आहे. नवीन वर्षाची सुरवात सुद्धा माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेतील प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये झाली.

पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Srirang Barne) आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (ShivajiRao AdhalRao Patil) हे शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात (बाळासाहेबांच्या शिवसेनेत) गेले आहेत. तेथे त्यांना उपनेतेपद देण्यात आले आहे. शिवसेना फुटीनंतर शिंदे गट राज्यात सत्तेत आल्याने त्यांच्याकडे इनकमिंग सुरु झाले आहे.

Pimpri-Chinchwad
Shahajibapu Patil : काय ते वर्क आऊट, काय ते डाएट.., एका आठवड्यात ९ किलो वजन घटवलं; शहाजीबापूंचा नवा लूक

२५ डिसेंबरला पिंपरी-चिंचवडमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे आणि ३० महिलांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याच दिवशी उपनेते आढळऱाव यांच्या लांडेवाडी (ता.मंचर,ता.आंबेगाव,जि.पुणे) येथील निवासस्थानी जनता दरबारामध्ये शिरूर तालुक्यातील १५० महिलांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षात प्रवेश केला होता.

काल माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप कुसाळकर यांच्यासह काळेवाडी, राहटणी परिसरातील १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपनेते श्रीरंग बारणे त्यांचे स्वागत केले. बारणे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन आणि जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्या प्रयत्नातून हा प्रवेश झाला.

Pimpri-Chinchwad
Chandrapur : वाघांच्या या भूमीत वज्रमूठ बांधा आणि सांगा की यापुढे विजय आमचाच…

''पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्याने प्रेरित होवून कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत. त्यांची कार्यशैली भावल्याने बाळासाहेबांच्या शिवसेनेत अनेकजण प्रवेश करीत आहेत. त्यामुळे उद्योगनगरीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन मजबूत होत असून त्याचा आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल'', असा विश्वास बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in