पिंपरी आयुक्तालयात कोरोनाचा विस्फोट; ६५ जण पॅाझिटिव्ह

कोरोना झालेल्या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर आहेत.
पिंपरी आयुक्तालयात कोरोनाचा विस्फोट; ६५ जण पॅाझिटिव्ह
coronasarkarnama

पिंपरी : राज्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्तालयातही कोरोनाने (Corona) शिरकाव केला आहे. ६५ अधिकारी व कर्मचारी पॅाझिटिव्ह सापडे आहेत. तिसऱ्या लाटेचा वेगाने प्रसार होत असला, तरी ती धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण कोरोना झालेल्या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर आहेत. बहूतांश, तर घरीच उपचार घेत असून ६५ पैकी फक्त पाचजण रुग्णालयात दाखल आहेत.

corona
औरंगाबादकरांनो नियम पाळा, लस घ्या; कोरोनाबाधितांचा आकडा ४८४ वर पोहचला..

दरम्यान, पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, पन्नाशीपुढील पोलिसांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना झालेल्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांची दररोज पोलिस आयुक्तालयातून फोनव्दारे विचारपूस केली जात आहे. कोरोना झालेल्यांना उपचारासाठी चार खासगी रुग्णालयात खास सोय करण्यात आली असून त्यात बिर्ला या तारांकित रुग्णालयाचाही समावेश आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ८६३ पोलिस अधिकारी व अंमलदारांना कोरोना होऊन त्यातील पाचजणांचा बळी गेला होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपले अधिकारी व कर्मचाऱ्यांची आगाऊ विशेष काळजी घेतली आहे. पन्नासीपूढील पोलिसांना जनतेशी संपर्क येईल, अशी ड्यूटी देणे त्यांनी बंद केले आहे. काय करावे आणि काय करू नये याची यादीच तयार केली आहे.

corona
‘सरकारनामा’ औंध-बोपोडीत : आमदार-खासदार काळे की गोरे दोन वर्षांत पाहिलेच नाहीत!

बैठका ऑनलाईन घेण्यास आणि थेट टपालाऐवजी ई मेल वापरण्यास सांगण्यात आले आहे. अभ्यांगतांना पास देणे थांबविण्यात आले असून त्यांना कार्यालय परिसरात प्रवेश करण्यापासून परावृत्त करण्यास सांगण्यात आले आहे. परिणामी पोलिस ठाण्यावर दाद न मिळणाऱ्यांना आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासाठी तूर्तास काहीशी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in