
Pune By Election Result : चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होईल, अशी चर्चा होती. सध्या या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यात मात्र ही दुरंगी लढत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या फेरीपासून भाजपच्या अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रावादीचे नाना काटे दुसऱ्या स्थानावर आहेत. काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यातील मतांचा फरक पहिल्यापासून जास्तच राहिला आहे.
चिंचवडमध्ये मतमोजणीच्या ३७ फेऱ्या होणार आहेत. त्यातील आता २९ वी फेरी सुरू झाली आहे. यावेळी भाजपच्या जगताप यांना १०८३४४ मते, राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) यांना ८३००५ मते तर अपक्ष राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना ३५३६३ मते मिळाली आहे. तत्पुर्वी २८ व्या फेरीतच भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी आपल्या एक लाख मतांचा टप्पा पूर्ण केला आहे. २९ फेरीत त्या २५३३९ मतांनी आघाडीवर आहेत. तर काटे आणि कलाटे यांच्यात तब्बल ४७६४२ मतांचा फरक आहे.
सुरवातीच्या सलग ११ फेऱ्यांत जगताप यांनी आघाडी घेतली होती. १२ व्या फेरीत मात्र त्या पिछाडीवर होत्या. त्यावेळी जगताप या सुमारे नऊ हजार मतांनी आघाडीवर होत्या. यावेळीच जगताप यांनी पुढील फेऱ्यांत जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) म्हणाल्या की, "दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने मतदान केले आहे. त्यांच्या प्रेमापोटी मला मते मिळाली आहेत. त्यांनी केलेल्या कामाचीच ही पोचपावती आहे. यापूर्वीही जनतेने लक्ष्मणभाऊंवर भरभरून प्रेम केले. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत आहे. आणखी फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे लीड वाढेल."
आता २९ फेरीत जगताप यांना १०८३४४ मते, राष्ट्रवादीचे काटे यांना ८३००५ मते तर अपक्ष कलाटे यांना ३५३६३ मते मिळाली आहे. २९ फेरीत त्या २५३३९ मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीतील आता मतमोजणीच्या आठ फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे लवकरच येथीलही निकाल जाहीर होईल. येथून २५ हजार मतांनी आघाडीवर असलेल्या भाजपच्या उमेदवार जागताप यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि काँग्रेसचे नाना काटे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. चिंचवड मतदारसंघाची (Chinchwad Bypoll Election) मतमोजणी शंकर आण्णा गावडे कामगार भवनमध्ये सुरु झाली आहे. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.