लायकी असेल तर मावळातून निवडणूक लढवून दाखवा; सुनील शेळकेंचे पडळकरांना आव्हान

Sunil Shelke | Gopichand Padalkar |आपल्याला विधानपरिषद दिली म्हणून कुणावरतीही तोंड टाकायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
Gopichand Padalkar News, Sunil Shelke News
Gopichand Padalkar News, Sunil Shelke News

पिंपरी : भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे पवार कुटुंबीय व त्यातही शरद पवारांवर सारखीच अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. नाशिकच्या कांदा परिषदेत पवारांवर बोलताना सोमवारी (५ जून) त्यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांचा खरपूस समाचार मावळचे (जि.पुणे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके यांनी आज (ता.६) लगेचच घेतला. लायकी नसलेली व्यक्ती असा पडळकरांचा उल्लेख करीत मावळातून निवडणूक लढवून दाखवावी,असे खुले आव्हान त्यांनी पडळकरांना दिले आहे. (Gopichand Padalkar News)

शरद पवारांविषयी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत पडळकरांनी कांदा परिषदेत पवारांवर पुन्हा शिवराळ टीका काल केली. महाराष्ट्रातील जनता ज्यांचे वक्तव स्वीकारत होती. ते शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे वक्तव्य बोलणे हे लायकी नसलेल्या पडळकरांसाऱख्या व्यक्तीने बोलणे हे राज्यातील जनतेला शोभणारे नाही, असा टोला शेळकेंनी लगावला. लायकी बघून त्यांनी बोलावे,असाही सल्लाही आमदार शेळके यांनी दिला.

Gopichand Padalkar News, Sunil Shelke News
Rajya Sabha : गिरीश महाजन कोणाला गळाला लावणार, यावर निकाल ठरणार..

त्याअगोदर पडळकरांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, आपल्या पिलावळीला समजून सांगितले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. ज्यांनी आपले आयुष्य महाराष्ट्राकरिता वेचले अशा व्यक्तींविषयी किती व काय बोलले पाहिजे, निव्वळ आपल्याला विधानपरिषद दिली म्हणून कुणावरतीही तोंड टाकायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,असेही ते म्हणाले. ग्रामपंचायतीत काडीचीही किंमत नसलेल्या पडळकरांनी विधानसभेला काय दिवे लावले हे माहिती आहे. त्यांचे डिपॉझिट जनतेने जप्त केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा बेताल व चाभरेपणाने बोलणाऱ्यांना महत्व न देण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच पडळकरांमागे असलेल्या तडफड करणाऱ्या फडणवीसांनाही सांगा ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही,सुधरुन घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. (Sunil Shelke News)

सध्या राज्यात खालावत चाललेल्या राजकारणाच्या दर्जामागील सूत्रधार कोण आहे, हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे,असे आ. शेळके म्हणाले.मविआ सरकारने कोविड काळातही चांगले काम केले आहे, त्यावरून तसेच देशातील महागाई आणि बेरोजगारीवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची स्ट्र्रटेजी आहे,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in