पुण्यात रूग्ण वाढले तर निर्बंधही वाढणार - if patient encrise ristriction will be encrise | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात रूग्ण वाढले तर निर्बंधही वाढणार

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 मार्च 2021

कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या आणखी चार दिवस अशीच राहिली तर चार दिवसानंतर निर्बंध वाढविण्याबाबत अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे.

पुणे : कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या आणखी चार दिवस अशीच राहिली तर चार दिवसानंतर निर्बंध वाढविण्याबाबत अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे. संख्या वाढत असली तरी पुण्यातील सरकारी रूग्णांलयामध्ये रूग्ण सामावून घेण्याची पुरेशी क्षमता असल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

शहरात आज दिवसभरात ६८८ रूग्णांची नोंद झाली. पुण्यातल्या स्थितीची आढावा घेण्यासाठी आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख तसेच महापालिका व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत काम करणारे आधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. परंतु या रुग्णसंख्येसाठी ससूनसह खासगी रुग्णालयात पुरेसे बेड॒स आहेत. त्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातील जम्बो हॉस्पिटलमध्ये ‘आयसीयू’ ‘बेड॒स’ऐवजी केवळ ऑक्सिजनयुक्त बेड॒सची सुविधा राहील. तसेच, कंत्राटदारास ते पुढील १५ दिवस भाडे न देता सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.जम्बो हॉस्पिटलसह निर्बंधांबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठकीत होणार आहे. यावेळी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा-महाविद्यालये १५ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्याशिवाय, आणखी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी ‘आयसर’ आणि ‘टीसीएस’ या संस्क्षांकडून शास्त्रोक्त अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही निर्बंध लावण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारच्या आढावा बैठकीत होणार आहे.

एकूण परिस्थिती पाहता पुण्यात ‘लॉकडाऊन’ची गरज भासणार नसल्याचे या व्यवस्थेत काम करणाऱ्या आधिकारी खासगीत बोलताना सांगितले. मात्र, येत्या काळात प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. सामाजिक अंतर, सॉनिटायझरचा वापर, मास्कचा काटेकारे वापर व गर्दी टाळणे यावर प्रत्येक नागरीकांनी अंमलबजावणी केल्यास कोरोनाचा लढा लॉकडाऊन शिवाय आपण जिंकू शकतो, असे या आधिकाऱ्यांनी सांगितले.
Edited By : Umesh ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख