अब्दुल सत्तार आठ दिवसांत आमदारकीचा राजीनामा देणार; पण....

त्यातून दूध का दूध आणि पानी का पानी लगेच होऊन जाईल.
Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama

पुणे : ‘युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जरी आमदारकीचा राजीनामा दिला नाही तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मला परवानगी दिली तर आठवडाभराच्या आत तुम्हाला माझ्या राजीनाम्याची बातमी दिसेल,’ अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री आणि एकनाथ शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली. (If Chief Minister gives permission, Abdul Sattar will resign from MLA in the next week)

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिवसेना नेत्यांमध्ये बंडखोरीनंतर आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर खालच्या पातळीवर टिकाटिप्पणी होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांकडून विशेषतः आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर तुटून पडत आहेत. बंडखोरांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान देण्यात येत आहे. त्याला कृषीमंत्री सत्तार यांनी प्रतिआव्हान दिले आहे.

Abdul Sattar
बारामतीत अश्लिल संभाषणाची ऑडियो क्लिप पुन्हा व्हायरल झाल्याने खळबळ!

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, मी सिल्लोडचा राजीनामा देतो, असे आव्हान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते. त्याबाबत बोलताना कृषिमंत्री सत्तार म्हणाले की, माझे आव्हान आमचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अडलेले आहे. आदित्य ठाकरेंनी वरळीतून राजीनामा द्यावा; मी सिल्लोडहून राजीनामा देतो, असे मी बोललो होतो.

Abdul Sattar
सोलापूरचे शिक्षणाधिकारी लोहारच्या कोल्हापुरातील घराची पाच तास झाडाझडती

निवडणूक काय असते, हे दोन वर्षानंतर तुम्हाला माहिती होईल, असे आव्हान आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांकडून बंडखोर आमदारांना दिले जात आहे. त्यावर मी म्हटलं दोन वर्षे कशाला वाट बघता, आपल्या दोघांची ट्रायल मॅच होऊ द्या. तुम्ही मुंबईतून राजीनामा द्या, मी सिल्लोडमधून राजीनामा देतो, त्यातून दूध का दूध आणि पानी का पानी लगेच होऊन जाईल, असे आव्हानही सत्तार यांनी ठाकरे यांना दिले.

Abdul Sattar
अमरावतीचा पुढचा खासदार बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा असेल : आमदार पटेल यांची मेळाव्यात घोषणा

आता आपलं आदित्य ठाकरे यांना ओपन चॅलेंज आहे. आदित्य ठाकरे यांनी जरी आमदारकीचा राजीनामा दिला नाही, तरी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली, तर एका आठवडाभराच्या आत तुम्हाला माझ्या राजीनाम्याची बातमी दिसेल, असेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com