Pune News  Alandi News
Pune News Alandi News Sarkarnama

Pune News : मुर्तीपूजा म्हणजे सैतानाची पूजा सांगत, आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न!

Pune News : भारत-श्रीलंका क्रिकेटसाठी पोलिस तैनात होते, म्हणून तपासाला वेळ मिळाले नाही, पोलिसांचे उत्तर!

पिंपरी: हिंदू धर्माविषयी द्वेष निर्माण करून गरीब पिचलेल्या वर्गाचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याचा खळबळजनक प्रयत्न श्रीक्षेत्र आळंदी व पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात नुकताच करणयात आल्याचे उघडकीस आले आहे. त्याबाबत आळंदी आणि दिघी पोलिस ठाण्यात धार्मिक व्देष निर्माण केल्याचा, धार्मिक प्रचार-प्रसार केल्याचा, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तिघांविरुद्ध नोंदविण्यात आ

या प्रकरणावरून मोठे राजकारण रंगण्याची शक्यता असून, भाजप हा मुद्दा उचलून धरेल,असा अंदाज आहे.कारण या तिघांनी आमिष दाखवून, तसेच यांनी दाखवलेल्या भीतीला काहीजण बळी पडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला असण्याची शक्यता आहे. दिघीत ३, तर आळंदीत ४ जानेवारीला हा गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर बाबूराव सुर्यवंशी व इतर दोघे त्यात आरोपी आहेत.

दिघीतील हा प्रकार गेल्या १७ डिसेंबरला, तर आळंदीत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घड़लेला आहे.गहुंजे येथील कालच्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील २०-ट्वेंटीच्या क्रिकेट सामन्यासाठी पोलिसांचा तिकडे बंदोबस्त होता. म्हणून त्यांना या दोन गुन्ह्यांच्या तपासाला वेळ मिळाला नाही. आरोपींना अजून अटक झाली नसल्याचे या दोन्ही पोलिस ठाण्यांतून सरकारनामाला सांगण्यात आले.

Pune News  Alandi News
BJP News : भाजपचा मोठा नेता अडचणीत : ठेकेदार आत्महत्याप्रकरणी कोर्टाने संपूर्ण कागदपत्रे मागवली

मुर्तीपूजा म्हणजे सैतानाची पूजा आहे, त्यामुळे सर्व देव पाण्यात टाका. सरस्वतीची पूजा केल्याने घरात पैसा येतो ही अंधश्रद्धा असून केवळ येशूची पूजा केल्याने आर्थिक परिस्थिती चांगली होते, असे हे तिन्ही धर्मांतरीत ख्रिश्नन आरोपी हे धर्मांतर करण्यासाठी सांगत होते. तसेच येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचा रस आणि मांस खायला देऊन ते धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते,असे या पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हटले आहे.

Pune News  Alandi News
Karad : शिंदे-फडणवीस सरकारनेच हिवाळी अधिवेशन गुंडाळले...पृथ्वीराज चव्हाण

येशूचे रक्त प्राशन केल्याने आणि पवित्र मांस खाल्याने सर्व आजार बरे होतात,असा दावा आरोपींनी केला आहे. तसे ते घरोघरी जाऊन पूजेचे निमित्त करून सांगत होते. त्यासाठी ते हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील, अशाप्रकारे त्यांच्या देवदेवतांबद्दल, मुर्तीपुजेविषयी अपमानजनक वक्तव्ये बेधडक करीत होते. मात्र, विशाल रामचंद्र पवार (वय २३,रा.इंद्रायणीनगर)या प्लंबर तरुणाने हे पाहून त्याबाबत थेट दिघी पोलिस ठाणे गाठले. तक्रार दिल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला.

Pune News  Alandi News
Ukraine Russia War : युद्धविरामानंतरही रशियाने आमच्यावर हल्ले केले : युक्रेनने लावले आरोप!

तीन आरोपींनी भीती आणि आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न लगेचच आळंदीत काही दिवसांतच केला. त्याबाबत उद्धव नागनाथ कांबळे (वय ४३,रा. पद्मावती रोड,आळंदी,मूळ रा. बोरी, उमरगा,जि.लातूर)या मजुराने फिर्याद दिली आहे.त्यांच्यासह त्यांच्या समाजातील इतरांनाही त्यांचा धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी आरोपींनी उद्युक्त केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in