छत्रपती संभाजीराजेंना 'राष्ट्र प्रतिक' म्हणून ओळख द्या..

भोसरी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Shambhaji Maharaj) जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj

Chhatrapati Sambhaji Maharaj

Sarkarnama

पिंपरी : एकशे दहा कोटी रुपये खर्चून पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघात मोशी येथे महापालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या शंभूसृष्टीसाठी स्थानिक आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांचा पुढाकार आहे. तेथे छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Shambhaji Maharaj) जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे. त्यानंतर आमदार लांडगेंनी आता राष्ट्रपुरूषांच्या यादीत राज्य सरकारने (State Government) धर्मवीर संभाजी महाराजांचा समावेश करावा, त्यांचा शासकीय दिनदर्शिकेत उल्लेख 'राष्ट्र प्रतिक' म्हणून करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj

अमित शहा पिंपरीत पुन्हा येणार..

नुकतेच (ता.१९) महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना लांडगेंनी साडेपाच एकरात उभारल्या जात असलेल्या मोशी येथील शंभूसृष्टीची माहिती दिली. तसेच, तेथे उभारण्यात येत असलेल्या शंभूराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती भेट दिली होती. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीचे जगविख्यात शिल्पकार राम सुतार हेच शंभूसृष्टीतील पुतळा दिल्लीत साकारत आहेत. त्याचे 53 टक्के काम झाले आहे. पुढील वर्षात त्याच्या अनावरणाला शहा हे येणार आहेत. दरम्यान, या शंभूसृष्टीनंतर आता धर्मवीर संभाजी महाराज यांचा समावेश राष्ट्रपुरूषांच्या यादीत करण्याची मागणी लांडगेंनी केली आहे. कारण, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी हौताम्य पत्करले आहे, असे ते म्हणाले.

Chhatrapati Sambhaji Maharaj

फडणवीस भुजबळांना म्हणाले; तुमच्यापेक्षा चारपट पुरावे माझ्याकडे आहेत

सध्या मुंबईत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे अधिवेशनाला उपस्थित नाहीत. त्यामुळे आपल्या या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य सचिव कार्यालयाकडे दिले आहे. हिंदू धर्म आणि हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी प्राण वेचणाऱ्या आपल्या शंभूराजाप्रती आदर म्हणून त्यांचा शासकीय दिनदर्शिकेत 'धर्म प्रतिक' म्हणून उल्लेख व्हावा, अशी माझ्यासह तमाम शिव-शंभू प्रेमींची अपेक्षा आहे. त्यामुळे सहा दिवसांच्या या अधिवेशनात लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न न मांडता याबाबत चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्य सरकारच्या दिनदर्शिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा उल्लेख नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे शासनाने ही चूक तात्कळ दुरूस्त करून महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी सर्व शासकीय कार्यालये आणि आस्थापनांमध्ये साजरी करावी. तसे आदेश सर्व विभागाच्या कार्यालयांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com