IPS Transfers : पुण्याच्या पोलीस आयुक्तपदासाठी ‘या’ नावांची चर्चा !

Pune Police Commissioner : पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाबरोबरच पुणे महापालिकेचे नवे आयुक्त कोण याचीही चर्चा आहे. आयुक्त विक्रमकुमार यांची दोन वर्षांची टर्म पूर्ण झाली आहे.
Pune Police Commissioner
Pune Police CommissionerSarkarnama

पुणे : गेल्या आठवड्यात राज्यातील ४४ ‘आयएएस’ आधिकाऱ्यांच्या (IAS Officer) बदल्या करण्यात आल्या. उर्वरित ‘आयएएस’ आधिकारी तसेच ‘आयपीएस’ (IPS Officer) आधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवड्याभरात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदासाठी जवळपास अर्धा डझन नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये वरिष्ठ ‘आयपीएस’ आधिकारी देवेन भारती, अर्चना त्यागी, अमितेशकुमार, रितेशकुमार,आषुतोष डुंबरे व संजय सक्सेना अशा भल्या मोठ्या यादीची चर्चा आहे.

Pune Police Commissioner
उद्धव ठाकरेंची 'ती' टीका मुख्यमंत्री शिंदेंच्या जिव्हारी; भाषण करताना पाराच चढला...

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाबरोबरच पुणे महापालिकेचे नवे आयुक्त कोण याचीही चर्चा आहे. आयुक्त विक्रमकुमार यांची दोन वर्षांची टर्म पूर्ण झाली आहे. त्यांच्याजागी प्रामुख्याने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्या नावाची चर्चा आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राव हे गेली जवळपास सात वर्षे पुण्यात विविध पदावर काम पाहात आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून काम पाहात आहेत.

Pune Police Commissioner
सतेज पाटील महाडिकांना सोलापुरातही धक्का देणार : ‘भीमा’च्या निवडणुकीत पाटील-परिचारकांना साथ?

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची दोन वर्षाची टर्म संपली आहे. त्यांची जागा कोण घेणार याबाबतही उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी आधिकारी आयुषप्रसाद यांची बदली प्रतिक्षेत आहे. पुणे जिल्हा आणि शहराच्या दृष्टीने महत्वाच्या या पाच जागांवर येत्या आठवड्याभरात खांदेपालट होणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या जागी राज्य पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ ‘आयपीएस’ अधिकारी देवेन भारती, अर्चना त्यागी अमितेशकुमार, रितेशकुमार, आषुतोष डुंबरे आणि संजय सक्सेना यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे. कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकपदासाठी विजय जाधव, सुनील फुलारी, संजय मोहिते, जालिंदर सुपेकर आणि संदीप पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदासाठी अंकित गोयल यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर या नावांची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात पुण्याचे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तपदी कोण येणार हे येत्या पाच ते सहा दिवसात स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com