Sharad Pawar

Sharad Pawar

Sarkarnama 

`माझी महाराष्ट्रात परत येण्याची इच्छा नव्हती... मला इमोशनल केलं गेलं..`

शरद पवार (Sharad Pawar) हे संरक्षणमंत्रीपद सोडून महाराष्ट्रात चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आले होते.

पुणे : संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत काम पाहत असताना शरद पवार (Sharad Pawar) हे जानेवारी 1993 मध्ये पुन्हा महाराष्ट्रात चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून परत आले. राष्ट्रीय नेता म्हणून शरद पवार पुढे येत असताना त्यांना पुन्हा राज्यात यावे लागले. त्याचे कारण पवार यांनी आज एका मुलाखतीत सांगितले.

``बाबरी मशीद सहा डिसेंबर 1992 मध्ये पडल्यानंतर राज्यात दंगली सुरू झाल्या होत्या. माझं राज्य जळत होते. ते रोखण्यासाठी तुमच्यासारखा नेता हवा, असे सांगत मला इमोशनलं केलं गेलं. माझी राज्यात परत यायची नव्हती. पण राज्य सावरण्यासाठी मी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, अशी आठवण पवार यांनी आज पुण्यात एका मुलाखतीत सांगितली. त्यासाठी मला सहा साडेसहा तास आग्रह सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Sharad Pawar</p></div>
IPS कृष्ण प्रकाश यांनी गुंडांवर झाड फेकून मारले.. ही पिक्चरची स्टोरी की खरेच तसे घडले?

बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईचे जनजीनव उद्ध्वस्त झाले होते. त्या वेळी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे होते. मुंबईतील स्थिती हाताळण्यासाठी तुम्ही जा, असे मला सांगण्यात आले होते. तेव्हा मी संरक्षणमंत्री होतो. मात्र त्या वेळी माझ्या लक्षात आले की संघर्षात निर्णय घेण्यासाठी एकच अॅथोरीटी हवी. तेव्हा मी आणि सुधाकरराव असे दोघे निर्णय घेत होतो. त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मी पुन्हा दिल्लीत आलो, असेही पवारांनी स्पष्ट केले.

त्यानंतर दंगली वाढल्या. जनजीवन सुरळीत झाले नाही. त्यामुळे मुंबई स्थिरस्थावर करण्यासाठी मलाच पुन्हा मुंबईत मुख्यमंत्री म्हणूनच जाण्याचा आग्रह झाला. त्यासाठी मला तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या निवासस्थानी बोलविण्यात आलं. त्यांनी मला तुम्ही गेल्याशिवाय गत्यंतर नाही, असे सांगितले. त्यामुळे मला पुन्हा महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे पवार यांनी मुलाखतीत नमूद केले.

<div class="paragraphs"><p>Sharad Pawar</p></div>
नानांची मंत्रीपदाची इच्छा पूर्ण होईना.. म्हणूनच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा घोळ संपेना!

महाराष्ट्रात पुन्हा आल्याने राष्ट्रीय नेता म्हणून पुढे जाण्यावर काही परिणाम झाला का या प्रश्नावर पवार यांनी तसे असेलही असे उत्तर दिले. मुंबईत मार्च महिन्यात बाॅंम्बस्फोट झाल्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी कसे खोटे बोललो हे पण या निमित्ताने सांगितले. 12 ठिकाणी बाॅम्बस्फोट झाले होते. पण एकूण 13 स्फोट झाल्याचे सांगत तो स्फोट मशिदित झाल्याची माहिती दिली. त्यामुळे मुंबई पूर्ववत होण्यास मदत झाल्याचा अनुभव त्यांनी मांडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com