मी संभाजीराजेंना म्हणालो; समोरच्यानींही राजकारण करू नये

मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी भाजपाची सुरवातीपासूनची भूमिका आहे
fadanvis3.jpg
fadanvis3.jpg

पुणे : मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत. त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांना भेटण्यात गैर काहीच नाही.या विषयात भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. या विषयात कोणासोबतही बैठकीला बसण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, या विषयात समोरच्यानींही राजकारण करू नये, हे संबंधितांना सांगण्याची सूचना मी खासदार छत्रपती संभाजीराजेंना केली आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.(I said to Sambhaji Raje; Even the front side should not do politics) 

मराठा आरक्षणच्या विषयात खासदार छत्रपती संभाजीराजे विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. या संदर्भाने फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले ‘‘ मराठा आरक्षणाच्या विषयात राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित यावे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यासाठी ते सर्वांची भेट घेत आहेत. अशी भेट घेण्यात गैर काहीही नाही, असे मला वाटते. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी भाजपाची सुरवातीपासूनची भूमिका आहे. आमच्या सत्ताकाळात आरक्षण देण्यात आम्ही यशस्वी झालो होतो’’

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या चार दिवसात विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा यात समावेश आहे.मराठा आरक्षणाच्या निमित्ताने खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची घेतलेली भेट विशेष चर्चेची ठरली. आंबेडकर यांच्यासोबत नवे राजकीय समीकरण महाराष्ट्रात उदयास येते की काय ही चर्चा या निमित्ताने सुरू झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यसभेवर खासदार आहेत. मराठा आरक्षणाच्या विषयात ते आक्रमक आहेत. या विषयात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेकवेळा भेट मागितली. मात्र, त्यांना भेट मिळाली नाही, असे सांगण्यात येत आहे.या विषयाची माध्यमातही चर्चा झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट नाकारण्याच्या विषयात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या मनात नेमके काय आहे अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com