मी कुठेच गेलो नाही. येथेच आहे ! : विजयसिंह मोहिते-पाटील 

मी कुठेच गेलो नाही. येथेच आहे ! : विजयसिंह मोहिते-पाटील 

पुणे : "" मी कुठेच गेलो नाही. येथेच आहे असे सांगत ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी थेट सांगितले नसले तरी ते आजही राष्ट्रवादीत असल्याचे सांगितले जात आहे. 

शरद पवारसाहेबांना यापूर्वी मी दोन ते तीन वेळा भेटलो आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला काही माहित नसल्याचेही विजयदादा पाटील यांनी सांगितले. 

वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या (व्हीएसआय) वार्षिक पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने राजकारणातील एकमेकांचे विरोधक बनलेले राजकारणी बुधवारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. 

गेल्यावर्षी झालेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मात्र, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार होते.ी 

गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी विजयदादांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यावेळी दादाही काही राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी आजपर्यंत थेट भाजप प्रवेश केला नव्हता.

 आज साखर संकुलात राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते एकत्र आले. विजयदादा यांना पत्रकारांनी गाठले. आपण राष्ट्रवादीत आहात का ? असा प्रश्‍न केला असता त्यांनी थेट मी राष्ट्रवादीत आहे असे स्पष्ट केले नाही, मात्र इथेच आहे, कुठेही गेलो नसल्याचे स्पष्ट केले. म्हणजे विजयदादा हे आजही राष्ट्रवादीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com