निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी गणेश दर्शन करीत नाही, अजितदादांचा टोला कुणाला?

Ajit Pawar : बारामती जिंकण्यासाठी आतापासून जोरदार तयारी केलेल्या भाजपचे बारामतीत स्वागत आहे.
Ajit Pawar and Eknath Shinde Latest News
Ajit Pawar and Eknath Shinde Latest NewsSarkarnama

पिंपरी : गणशोत्सानमित्त मुख्यमंत्र्यांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते सध्या पुणे, मुंबईसह राज्यभरातील गणेश मंडळांना भेटी देत आहेत. अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. मात्र, कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण कुठलीही गोष्ट करीत नाही. त्याला हे गणेश दर्शनही अपवाद नाही,असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी (ता.८ ऑगस्ट) पिंपरी चिंचवड येथे स्पष्ट केले. त्यांचा हा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोखाने असल्याची चर्चा लगेचच ऐकायला मिळाली.

Ajit Pawar and Eknath Shinde Latest News
गणेश विसर्जन मिरवणुकीत डॅाल्बी वाजवताय मग ही बातमी वाचाच...

सध्या लगेचच कुठलीच निवडणूक नसल्याकडे लक्ष वेधत गणेश दर्शनामागे आपला राजकीय हेतू नसल्याचा खुलासा पवारांनी केला. पिंपरी-चिंचवड हे पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात होते, याकडे लक्ष वेधत प्रथा म्हणून गणपती दर्शन करतो,असे ते म्हणाले. त्यानिमित्त कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होतात, मंडळांना चांगलं वाटतं आणि मलाही समाधान मिळतं, असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या गणेश दर्शनाला दुपारपासून काळेवाडीतून सुरवात झाली. रात्री उशीरापर्यंत ते सुरु राहणार आहे. उद्या ते पुण्यातील दगडुशेठसह मानाचे व इतर गणपतींचे दर्शन करणार आहेत.

बारामती जिंकण्यासाठी भाजपने गणेशाला साकडे घातले आहे, यावर आपण गणपतीला काय साकडे घातले,अशी विचारणा केली असता, मी काहीही मागणं मागितलेलं नाही, असे सांगत बारामती जिंकण्यासाठी आतापासून जोरदार तयारी केलेल्या भाजपचे बारामतीत स्वागत आहे, बघू या बारामतीची जनता कोणाला साथ देते, असे पवार म्हणाले.

Ajit Pawar and Eknath Shinde Latest News
मित्रपक्षांची उणीव भरून काढण्यासाठी भाजपचा 'प्लॅन' तयार..'या' पंचसुत्रीवर कामही सुरू

मुंबई बॉम्बस्फोटातील आऱोपी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून भाजपने महाविकास आघाडी सरकार व त्यातही उद्धव ठाकरे व शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. त्यासंदर्भात बोलताना महागाई आणि बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे भाजप काढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी कुठल्याही देशद्रोही व्यक्तीसंदर्भात आणि कुठल्याही सरकारच्या काळात अशा गोष्टी घडता कामा नय़ेत, असेही ते म्हणाले. शिवसेनेमुळे भाजप ग्रामीण भागात गेली, त्यापूर्वी नव्हती पोचली, असेही पवारांनी आवर्जून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in