Sharad Pawar In Chinchwad: अडचणीत चिंचवडकरांनी मदत केली म्हणून पोटनिवडणुकीला आलो; पवारांनी सांगितला किस्सा

Chinchwad By Election : देशाची सेवा करण्याची संधी दिल्याने पिंपरी-चिंचवडशी वेगळचे नाते
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Chinchwad News: कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी चार दिवसानंतर मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीसह युतीचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंचवडच्या काही आठवणी सांगितल्या. तत्पुर्वी त्यांनी कधीच राज्यातील, देशातील पोटनिवडणुकीसाठी जात नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र चिंचवडशी माझे एक आगळेवेगळे नाते आहे. त्यामुळे आज येथे पोटनिवडणूक असूनही आलो, असे सुरुवातीलाच सांगितले. त्यानंतर त्यांनी थेट राजीव गांधी यांच्या संबंधित चिंचवडशी जोडलेला एक किस्सा सांगितला.

Sharad Pawar
Delhi Mayor Election : 'आप'ने मैदान मारलं; शैली ओबेरॉय दिल्लीच्या नव्या महापौर

शरद पवार म्हणाले, "इंदिरा गांधीजींची (Indira Gandhi) हत्या झाली होती. देशात सर्वत्र राजीव गांधीबद्दल सहानुभूतीचे वातावरण होते. त्यात दुसऱ्या बाजूला विरोधी म्हणून मी पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) येथे येऊन लढलो. त्यावेळी देशभरातील राजीव गांधींच्या सभेला हजारो, लाखोंच्या संख्येनी नागरिक उपस्थित राहत. देशातील जनतेने त्यांना विजयी केले. या भागातील जनतेने मात्र मला विजयी केले."

Sharad Pawar
Sanjay Raut : 'फडणवीस आणि अजित पवारांचे आभार मानतो' ; पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले राऊत?

पुढे त्या निवडणुकीबाबत पवार यांनी राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांच्याशी झालेल्या चर्चेचाही किस्सा सांगितला. पवार म्हणाले, "एखदा सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर राजीव गांधी, मी आणि इतर गप्पा मारत होतो. त्यावेळी राजीवजींनी सांगितले की, ज्यावेळी पिंपरी-चिंचवडला विमानाने आलो होतो, त्यावेळी खाली लाखोंची गर्दी दिसली. त्यानंतर विमान लोहगाव विमानतळावर उतरले. तेथे अधिकाऱ्यांनी सांगितले की तुमची सभा लगेच होणार नाही. कारण तेथे शरद पवारांची सभा सुरू आहे. त्यानंतर ते म्हणाले, देशात ज्या ठिकाणी सभा घेतल्या तेथील माझा उमेदवार निवडून आला. अपवाद फक्त चिंचवड ठरला."

Sharad Pawar
Sand smugglers : वाळू तस्करांची अशीही क्लुप्ती; राजकीय नेत्यांचे वजन वापरून काढला 'हा' मार्ग !

पुढे पवारांनी चिंचवडकरांमुळे देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्येचेही सांगितले. ते म्हणाले, "पिंपरी-चिंचवडमुळे मला देशाचे संरक्षण विभाग सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. दहा वर्षे देशाच्या अन्नधान्याची व्यवस्था केली. ते काम करण्याची संधी ज्यांनी दिली आज तो भाग आणि तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून अस्वस्थ होते. त्यामुळेच आज पोटनिवडणूक असूनही आलो आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com