पुणेकरांसाठी जावडेकर मंत्री म्हणून किती महत्वाचे होते ? - How important was Javadekar as a minister for the people of Pune? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

पुणेकरांसाठी जावडेकर मंत्री म्हणून किती महत्वाचे होते ?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 जुलै 2021


मुळात जावडेकर केंद्रीय मंत्री होते तरी त्यांचा पुण्यात वावर नव्हताच.

पुणे : केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या हाती भोपळा मिळाला. नावापुरते का होईना पण प्रकाश जावडेकर (prakash javadekar) यांच्या रूपाने पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व होते. जावडेकर यांना वगळल्याने केंद्रात पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व उरले नाही. पुणेकरांच्या दृष्टीने जावडेकर मंत्री होते का ? हाच प्रश्‍न असल्याने त्यांना वगळल्यानंतरही कसलीच प्रतिक्रिया उमटत नाही हे विशेष.(How important was Javadekar as a minister for the people of Pune?) 
 
मुळात जावडेकर केंद्रीय मंत्री होते तरी त्यांचा पुण्यात वावर नव्हताच. त्यांच्या मंत्रीपदाचा पुण्याला किंवा पश्‍चिम महाराष्ट्राला गेल्या सात वर्षात काय उपयोग झाला हे शोधावे लागेल. राजकारणाची सुरवात पुण्यातून केलेल्या जावडेकरांना २०१४ पासून सातत्याने सात वर्षे केंद्रात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र, या संधीचा उपयोग पुणे शहराला करून देता आला नाही.त्यामुळे पुणेकरांच्या दृष्टीने त्यांचे मंत्रीपद गेले काय आणि राहिले काय अशीच स्थिती आहे. 

भारतीय जनता पार्टीची केंद्रातील सत्ता आणि संघटना व पक्षशिस्त दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असे सांगत जावडेकर यांचा बचाव त्यांचा पक्ष करीलही. मात्र, त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात पुणेकरांना आणि पश्‍चिम महाराष्ट्राला काय मिळाले हा प्रश्‍न उरतोच. या काळात पुण्यासाठी जावडेकर यांच्या प्रयत्नाने एकही योजना आलेली नाही.पुण्यातील नदी सुधारणेसाठी जायकाकडून मदत मिळविण्याच्या कामातील पाठपुरावा सोडला तर गेल्या सात वर्षात जावडेकर यांच्या नावावर पुण्यासाठी केलेले एकही काम नाही हे दुर्देवाने म्हणावे लागत आहेत. 

जावडेकर सात वर्षे मंत्री राहिले आणि आता पायउतार झाले इतकेच. मधल्या सात वर्षाच्या काळात पुण्यासाठी काही भरीव करण्याची संधी त्यांनी गमावली. उलट या काळात आयआयएम, नॅशनल लॉ स्कूल यासारख्या पुण्यात येऊ शकणाऱ्या अनेक राष्ट्रीय संस्था इतरत्र गेल्या. पुण्यासाठी म्हणून जावडेकर केंद्रात आग्रही राहिले असते तर पुण्याला किमान एखादी तरी चांगली संस्था किंवा योजना मिळाली असती. त्यामुळे जावडेकरांचे सात वर्षे मंत्री म्हणून राहणे किंवा आता मंत्रीपदावरून जाणे पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरीकांसाठी ना अभिमानाची ना कौतुकाची बाब राहिली आहे.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख