मेरीटवर मिळालेले प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जातातच कसे? सुप्रिया सुळेंनी 'ती' लिस्ट दाखवली

गेल्या महिनाभरात राज्यातून चार मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले.
Cm Eknath Shinde-Supriya Sule News, Aurangabad
Cm Eknath Shinde-Supriya Sule News, AurangabadSarkarnama

मुंबई : आज चार-पाच मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. प्रकल्प बाहेर जातायेत यांच दुखं नाही ते आपल्याच देशात आहेत. पण जे प्रोजेक्ट महाराष्ट्राला मेरीटवर मिळालेत, तेही बाहेर जात आहेत याचं दुख आहे. ज्याच्यावर आपण काम सुरु केलं तेही बाहेर जातायेत याचं दुख आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

गेल्या महिनाभरात राज्यातून चार मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले. त्यातले तीन प्रकल्प तर गुजरातमध्ये गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. सिनारमास प्रकल्प त्यांनी आणला असा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. पण सिनारमास प्रोजेक्ट अनेक महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात आला होता. सिनारमासची गुंतवणूक तीन महिन्यात झाली नाही. त्यासाठी भूसंपादनही झालं होतं. या प्रोजेक्टची सर्व माहिती मी तुम्हाला देऊ शकते. असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आदिती तटकरे यांनी रायगडचे पालकमंत्री असताना या प्रोजेक्टच्या हस्तांतरणाचे काम केले आहे. त्यामुळे सिनारमास ची गुंतवणूक ही गेल्या तीन महिन्यात आल्याचा दावा जर सत्ताधारी करत असतील तर यापेक्षा हास्यास्पद गोष्ट कोणतीच नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Cm Eknath Shinde-Supriya Sule News, Aurangabad
'मातोश्री'चा उंबरठा न ओलांडणारे आता शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचं नाटकं करताहेत...

दुसरी गोष्ट, वरुन बेवरेजस हा अहमदनगरचा प्रोजेक्ट, योगायोगाने निलेश लंके तिथे आमदार होते. या प्रोजेक्टचेही भुसंपादन जून २०२० मध्येच झाले असून हा ८२० कोटींचा प्रोजेक्ट होता. त्यानंतर महाराष्ट्र सीमलेस प्रोजेक्ट हा सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या काळातचं झाला होता. पण काल सत्ताधारी नेत्यांनी जी लिस्ट वाचून दाखवली ती ऐकून मला हसु येत होतं. तुम्ही क्रेडीट घ्या पण ते प्रोजेक्ट आम्ही आणले हे कादगपत्रातून स्पष्ट आहे.

महाराष्ट्राला मेरीट लिस्टवर प्रोजेक्ट मिळालेले असताना ते राज्यातून बाहेर जात आहेत. जर प्रोजेक्ट बाहेर जात असतील तर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावली पाहिजे हा राज्याचा विषय आहे. असे विषय सर्वांशी बोलून सोडवले पाहिजेत. पण असं काय होतय की महाराष्ट्राला मेरीटवर मिळालेले प्रोजक्टही राज्यातून बाहेर जात आहेत. असं काय होतय की मेरीटवर पास झालेल्या मुलाची तुम्ही सीट काढून घेता आणि दुसऱ्या मुलाला देता. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनीच दिलं पाहिजे.

Cm Eknath Shinde-Supriya Sule News, Aurangabad
मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर कैलास पाटील यांचं उपोषण मागे

राज्याचे उद्योग मंत्री विरोधाभासी वक्तव्ये करतात, मुख्यमंत्री वेगवेगळ्या चॅनेल्सवर वेगवेगळी वक्तव्ये करतात. याहून जास्त म्हणजे प्रत्येकवेळी यापेक्षा मोठा प्रोजक्ट येईल असं लॉलीपॉप दाखवलं जात, मी म्हणते तोही प्रोजेक्ट येऊ दे आणि हाही राहु दे. मग सारखे का प्रोजेक्ट बाहेर जात आहेत, या मागे कोणती अदृश्य शक्ती आहे, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

मिहान प्रोजेक्ट हैदराबादला गेला. पण यावरुनही सत्ताधारी पक्षातील नेते महाविकास आघाडीवर आरोप करत आहेत, असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विद्यामान सरकारमधील नेते महाविकास आघाडी सरकारमध्येही होतेच की, तेव्हा ते काय झाेपले होते का, त्यांनी केलेले हे सर्व आरोप हास्यास्पद आहेत आणि आता तरी या गोष्टी गांभीर्यांने घेण्याची गरज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in