Dilip Walse Patil News : ''वारकऱ्यांवरील लाठीचार्जचं समर्थन कसं करता येईल?''; वळसे पाटलांचा फडणवीसांसह पोलीस आयुक्तांना सवाल

Ashadhi Wari 2023 News : '' हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या संस्कृतीला कालच्या घटनेनं गालबोट लागले..''
Dilip Walse-Patil  latest news |
Dilip Walse-Patil latest news |Sarkarnama

Alandi : पंढरपूरच्या वारीसाठी रविवारी(दि.११) श्री क्षेत्र आळंदी येथून रविवारी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. मात्र, या सोहळ्याला गालबोट लागले. मोठ्या संख्येने वारकरी, भाविक मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलीस आणि वारकरी यांच्यात झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी(Sant Dnyaneshwar Palkhi News) चा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केल्याची धक्कादायक घटना घडली. यावरुन विरोधीपक्षांनी लाठीचार्जवरुन सत्ताधारी पक्षांना धारेवर धरले आहे. तर फडणवीसांनी विरोधीपक्षांना खडेबोल सुनावतानाच या घटनेवरुन राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वारकऱ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणावरुन सरकारवर आगपाखड केली आहे. (Ashadhi Wari News)

Dilip Walse-Patil  latest news |
Devendra Fadnavis News : फडणवीसांची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका; म्हणाले, "तुमची मजल टु-जी, थ्री-जी अन् सोनियाजी..."

दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावर ते म्हणाले, आळंदीत चुकीच्या व्यवस्थापनामुळे गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला. या लाठीचार्जचे समर्थन कसे करता येईल असा सवाल वळसे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच ही घटना दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं.

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या संस्कृतीला गालबोट..

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या संस्कृतीला कालच्या घटनेनं गालबोट लागले. आळंदीत योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले नाही. त्यामुळे गर्दी वाढली, अशावेळी पोलिसांनी संयमाने न घेता केलेली लाठीचार्जचा प्रकार हा समर्थन करण्याचा विषयच नाही असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला आहे.

Dilip Walse-Patil  latest news |
Sanjay Rauts allegation on bjp : आळंदीत औरंग्याची औलाद कशी निर्माण झाली ? ; वारकऱ्यांच्या हल्ल्यांवरुन राऊत संतप्त

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आळंदीत लाठीमार झाला नसून फक्त वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला असा दावा केला आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं वृत्त फेटाळलं आहे.

चौबे म्हणाले, "बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली. पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करत आहेत. महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये असंही आवाहन पोलीस आयुक्त चौबे यांनी म्हटलं आहे.

Dilip Walse-Patil  latest news |
Thackeray Group On Ajit Pawar : ''राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही...''; ठाकरे गटानं अजित पवारांना डिवचलं

फडणवीस काय म्हणाले ?

आळंदीत कोणताही लाठीचार्ज झालेला नाही. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. अशाही स्थितीत विरोधकांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com