गृहमंत्र्यांच्या कट्टर समर्थकाकडून माझ्या कार्यकर्त्याला मारहाण : आढळरावांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धमकीही दिली आहे, त्याचा ऑडिओही फिरतो आहे.
गृहमंत्र्यांच्या कट्टर समर्थकाकडून माझ्या कार्यकर्त्याला मारहाण : आढळरावांचा गंभीर आरोप

Shivajirao Adhalrao Patil

sarkarnama

पुणे ः ‘‘माझा फोटो आणि व्हिडिओ स्टेट्‌स ठेवल्याने गृहमंत्र्यांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कार्यकर्त्याने माझ्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली. तसेच, धमकीही दिली. त्याबाबतचा ऑडिओ संपूर्ण राज्यात फिरतो आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्याने केले आहे,’’ असा गंभीर आरोप शिवसेनेचे (Shivsena) उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil) यांनी केला. (Home Minister's activist's beats my activist : Adhalrao Patil)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रविवारी (ता. २ जानेवारी) आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी पुणे जिल्ह्यातील महाआघाडीच्या कारभारबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

<div class="paragraphs"><p>Shivajirao Adhalrao Patil</p></div>
अंकिता पाटील-ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

आढळराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत आमची कोणतीही तक्रार नाही. आम्ही महाविकास आघाडीची भूमिका स्वीकारलेलीच आहे आणि ही आघाडीही आम्हाला मान्य आहे. पण, आमचे (शिवसेनेचे) अस्तित्व तरीही राहू द्या. आम्हाला मारू नका. मला एकच विनंती करायची आहे की, शिवसैनिकांना जगू द्या आणि आम्हाला जगू द्या. आम्ही कोणाची छेड काढत नाही. कुणाच्या नादीही लागत नाही. पण आम्हाला संपवू नका; आम्हाला जगू द्या, एवढीच माफक आमची अपेक्षा आहे.

<div class="paragraphs"><p>Shivajirao Adhalrao Patil</p></div>
आदित्यने माझा ताण हलका केला : उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून होणारा त्रास मी माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या कानावर वेळोवेळी घातला आहे. शिवसेनेचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही वेळोवेळी त्यांच्या पक्षनेतृत्वाच्या कानावर या सर्व गोष्टी घातल्या आहेत, असेही माजी आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. एकंदरीतच पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नाही, हेच दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद वेळोवेळी चव्हाट्यावर आलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.