वळसे पाटलांनी दिला सुखी संसाराचा कानमंत्र

Dilip Walse-Patil| गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आंबेगाव तालुक्यातील गावभेटी दौ-यावर आहेत.
Dilip Walse-Patil|
Dilip Walse-Patil|

Dilip Walse Patil Latest news update

रोहिदास गाडगे

आंबेगाव : ''सुखी संसारासाठी घरी न रहाता नव-याने बाहेर राहाणंच योग्य..! '' असा अजब सल्ला भरसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) दिला आहे. आंबेगाव दौऱ्यादरम्यान बी डी काळे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मी काही अंदाजे बोलत नाहीये. कोरोना संसर्ग काळात गृहकलह आणि घटस्फोटाचे प्रमाण वाढले. मी काही असंच नाही बोलत आहे, पण आमच्याकडे जे रिपोर्ट्स आले त्यावरुन मी सांगत आहे, असा दावाही त्यांनी म्हटलं.

या कार्यक्रमात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर भर सभेत एकच हशा पिकला. मात्र या विधानाबाबत पुन्हा सारवासारव करत गृह कलह आणि घटस्फोटाचे हे प्रमाण आपल्या देशापेक्षा इतर देशांमध्ये जास्त असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे ज्याचं त्याचं काम ज्याने त्यानेच कराव. हे काही वाटून घेतलेलं काम नसतं. गृहिणीची साथ असतेच. दोघांनी एकत्रित मिळून स्वत: चा संसार करावा. मुलाबाळांना वाढवावं, असंही त्यांनी सांगितलं.

Dilip Walse-Patil|
भाजपनेच राज ठाकरेंना उघडं पाडलं; सचिन सावंताचा आरोप

दरम्यान, शनिवार (२१ मे) गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आंबेगाव तालुक्यातील गावभेटी दौ-यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी खरीप हंगाम आणि वादळी वारे पाऊस यातुन होणा-या दुर्घटना रोखण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सर्व विभागांची घोडेगाव पंचायत समितीत बैठक घेतली. यावेळी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील विविध विकास कामे, आरोग्य व्यवस्था याबाबत प्रशासनाशी चर्चा केली. पंचायत समिती त प्रत्येक विभागाच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली यावेळी प्रशासकिय विभागांचे प्रमुख आधिकारी उपस्थित होते

याप्रसंगी बी. डी. काळे महाविद्यालयातील प्राचार्य इंद्रजित जाधव सेवानिवृत्ती समारंभ आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासह युवक महोत्सवात कार्यक्रमात प्राचार्य इंद्रजित जाधव यांच्या कार्याचा आज गौरव करण्यात आला. यावेळी खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com