वैशाली नागवडेंना झालेल्या मारहाणीवर वळसे पाटील म्हणाले, चूक कुणाची...

भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sarkarnama

पुणे : भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल (ता.16) जोरदार राडा झाला. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वैशाली नागवडेंसह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या काही पुरूष नेत्यांकडून मारहाण झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, चूक कोणाची आहे हे पाहण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. भाजपची चूक असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणं ही आक्षेपार्ह गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल.

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळेल

दरम्यान, पुण्यातल्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारण्याचं कोणतंही कारण नाही. त्यांनी परवानगी मागितली तर पोलीस ती देतील. पोलिसांनी घातलेल्या नियमांचं पालन करून त्यांनी सभा घ्यावी, असे वळसे पाटील यांनी सांगितंल.

Dilip Walse Patil
देशपांडेंनी पक्ष सोडताच शिवसेना म्हणाली, ते गेल्यानं काडीचाही फरक पडत नाही!

वैशाली नागवडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांवर कलम 323 (मारहाण करणे), 354 (विनयभंग), 504, 506 आणि 34 नुसार कारवाई केली आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईबद्दल वैशाली नागवडे म्हणाल्या की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं आहे. या आरोपींना वेळीच अटक व्हायला हवी. पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

Dilip Walse Patil
करारा जवाब मिळेल! रुपाली पाटलांचं जगदीश मुळीकांना आव्हान

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात काल हा राडा झाला. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या होत्या. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायला उठल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com