पोलिस भरतीसाठी माझ्याशी संपर्क साधू नका!

राज्यामध्ये एक वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama

मंचर : पोलिस भरतीच्या प्रक्रियेत (Police Recruitment) कोणाचाही वशिला चालणार नाही. मेरीटवर भरती होईल. त्यामुळे उगाच भेटण्यासाठी वेळ घालवु नका. बिनकामाचा खर्च करू नका, काहीच उपयोग होणार नाही. असा सल्ला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी कार्यकर्त्यांना दिला. ते एकलहरे (ता.आंबेगाव) येथे हॉटेल रविकिरणच्या प्रांगणात राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

या वेळी वळसे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार टिकू द्यायचे नाही. त्यासाठी केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करत आहे. कितीही त्रास द्यायचा प्रयत्न झाला तरी जेष्ठ नेते शरद पवार साहेबांसारखे उत्तुंग नेतृत्व मार्गदर्शन करायला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचीही चांगली साथ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करणार. याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. असा विश्वास वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Dilip Walse Patil
समीर वानखेडे प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले...

राज्यामध्ये एक वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा, ओबीसीं, धनगर, अल्पसंख्यांक समाजाची आरक्षणाची मागणी आहे. मागणीला पाठिंबा सगळ्यांचा आहे. कुठल्याच पक्षाचा विरोध नाही. पण भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या राज्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या लोकांना आरक्षण द्यायचे नाही. अशा प्रकारचा चुकीचा प्रचार करतात. हा अपप्रचार थांबवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असेही त्यांनी सांगितले. ३० ऑक्टोबरला वाढदिवस आहे. वाढदिवसाला मी भेटू शकणार नाही. त्यामुळे मला शोधायचा कुणीही प्रयत्न करू नका. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छ मिळाल्या. त्याबद्दल मनापासून आभार मानतो, असेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Dilip Walse Patil
वानखेडेंना अडचणीत आणणारा प्रभाकर साईल आता मुंबई पोलिसांच्या संरक्षणात

बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जेष्ठ नेते वसंतराव भालेराव, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, उषा कानडे, अंकित जाधव, प्रमोद कानडे, सचिन भोर, संदीप थोरात, के. के सैद यांची मनोगते झाली. रमेश खिलारी यांनी आभार मानले. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुषमा शिंदे, रमेश कानडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com