पवारांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाचे छापे अन् गृहमंत्री म्हणाले...

अभिनेता शाहरूखानच्या मुलाला गोवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
पवारांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाचे छापे अन् गृहमंत्री म्हणाले...
Dilip Walse-Patli sarkarnama

पिंपरी : गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळच्या नातेवाईकांवर आयकर विभागाकडून छापेसत्र सुरु आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यभरातून आल्या आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत या कारवाईचे पडसाद उमटले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patli) यांनीही याबाबत आता हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार हे सत्ता आणि आपल्या यंत्रणांचा वापर राजकीय कामासाठी करीत आहेत. यापूर्वी राजकारणात अशी परिस्थिती पाहिली नव्हती, अशी टीका त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता.९) केली. (Home Minister Dilip Walse Patil criticizes the central government)

Dilip Walse-Patli
पाण्यावरुन राजकारण पेटले ; आजी- माजी आमदार गटांमध्ये हाणामारी

एखाद्याच्या घरी जाऊन चौकशी करणे समजू शकतो. पण, त्याच्या सर्व नातेवाईकांच्या घरी जाऊन त्रास देणे, हे बरोबर नाही, अशी नाराजी गृहमंत्र्यांनी आयकर विभागाकडून सध्या सुरू असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या चौकशीवर व्यक्त केली. एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले असताना ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. आयकर विभागासह 'एनसीबी'च्या (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) कारभारावरही त्यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फरार आरोपी आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एनसीबी साक्षीदार वा पंच कसे काय घेऊ शकते, ते कितपत बरोबर आहे.

Dilip Walse-Patli
ज्योतिरादित्य शिंदेंनी मोदींना दिली ग्वाही; कोकणला देणार भरभरून!

अशी विचारणा त्यांनी नुकत्याच मोठ्या वादात सापडलेल्या एनसीबीच्या मुंबईतील जहाजावरील (क्रूझ)कारवाईवर केली. या क्रूझवरील रेव्ह पार्टीच्या कारवाईतून काही राजकीय नेत्यांच्या नातेवाईक तरुणांना वगळण्यात आले, तर अभिनेता शाहरूखानच्या मुलाला गोवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यात पंच म्हणून एनसीबीने भाजप पदाधिकारी मनिष भानूशाली आणि पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगार के.पी. गोसावी या दोघांना घेतल्याबद्दल राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी व एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य केले आहे.

Related Stories

No stories found.