'बालवाडीही सुरू न करू शकलेल्या राज ठाकरेंचे पवारांवरील आरोप बालिशपणाचे'

भोंगा व पवारसाहेब याव्यतिरिक्त ठाकरे यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. हे जनतेच्याही लक्षात येत आहे.
Dilip Walse Patil-Raj Thackeray
Dilip Walse Patil-Raj ThackeraySarkarnama

मंचर (जि. पुणे) : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांचे राज्य व देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ते काम करतात. ते जातीपातीचे राजकारण करतात, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आरोप बालिशपणाचा आहे. भोंगा व पवारसाहेब याव्यतिरिक्त ठाकरे यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. हे जनतेच्याही लक्षात येत आहे. ज्यांना बालवाडीही सुरू करता आली नाही, त्यांनी आरोप करण्याऐवजी महागाई, इंधन दरवाढ याबाबत बोलले असते तर चांगले झाले असते. पण, हे सर्वकाही ठरवून चाललेले आहे. पवारसाहेबांचे काम नजरेआड करण्यासाठीच राज ठाकरेंचा हा खटाटोप सुरू आहे. त्यात त्यांना यश येणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले. (Home Minister Dilip Walse Patil criticizes Raj Thackeray)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सोमवारी (ता. २ मे ) गृहमंत्री वळसे पाटील पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद येथे झालेल्या सभेत ठाकरे यांनी पवार यांच्यावर केलेल्या टीकेविषयी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयी वळसे पाटील म्हणाले की, गेली ५० ते ६० वर्ष पवार यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे केलेले काम व विकास कामे जनतेने जवळून पाहिली आहेत. मुंबई व औरंगाबादच्या सभेत फक्त पवारांवर टीका आणि भोंगा या व्यतिरिक्त कोणत्याही मुद्याला त्यांनी स्पर्श केला नाही. महागाईमुळे जनता त्रस्त आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. पेट्रोल, डिझेलचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत. याबद्दल राज ठाकरे चक्कर शब्दही बोलत नाही. भविष्यकालीन उपाययोजनांबाबत बोलण्याऐवजी नसलेल्या गोष्टी उकरून काढून समाजात वादंग निर्माण होईल. असे वक्तव्य त्यांनी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

Dilip Walse Patil-Raj Thackeray
तेव्हा शिवसेना कुठे होती हे सुंदर सिंह भंडारींना विचारा : राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

भोंग्याबाबत वळसे पाटील म्हणाले की, कीर्तन रात्री अकरापर्यंत सुरू असतात. ग्रामीण भागात मनोरंजनासाठी तमाशे रात्रभर सुरू असतात, तर काकडा पहाटे चार वाजता सुरू होतो. रात्री दहा ते पहाटे सहापर्यंत ध्वनीक्षेपक बंद ठेवल्यास काय परिणाम होऊ शकतो. याबाबतही त्यांनी विचार केला पाहिजे.

Dilip Walse Patil-Raj Thackeray
आरआर आबा, विजयदादा, जयंतराव अन्‌ मला या कारणांमुळे ‘ग्रामविकास’ला चांगल्या योजना देता आल्या!

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व घटकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे. ठाकरे यांच्याकडे सांगण्यासाठी कुठलाही कार्यक्रम नाही. भोंगा व नास्तिक असे मुद्दे काढून ते बोलतात. खोटे व बालिशपणाचे आरोप करतात. पवारांवर बोलले की प्रसिद्धी मिळते. राज ठाकरे यांचा बोलवता धनी भाजप आहे. हे आता सर्वश्रुत झाले आहे. इतिहासात रमणे ठीक आहे. पण भविष्यातील प्रश्न, उपाययोजना याबाबतही विचार मांडणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात तसं घडत नाही, असा टोलही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com