Pimpri-Chinchwad : होर्डिंग दुर्घटना प्रकरण; विविध पक्षांच्या नेत्यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाला घेरलं

Pune news : पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 2200 अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचा खासदार बारणेंचा खळबळजनक दावा
Pimpri-Chinchwad Politics
Pimpri-Chinchwad PoliticsSarkarnama

पिंपरी : वादळी पावसाने काल (ता.१७) सायंकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये एक अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले. त्यावरून मुदत संपलेल्या माजी नगरसेवक, पालिका पदाधिकारी, आमदार, खासदारांनी महापालिका आय़ुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना लक्ष्य केलं.

दरम्यान, उद्योगनगरीतील १४०७ पैकी ४३४ होर्डिंग्ज ही अनधिकृत असल्याचे शेखरसिंह यांनी आज सांगितले. तर, शहरात ही संख्या तब्बल बावीसशे असल्याचा दावा शहराचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी करीत आयुक्तांना घरचा आहेर दिला. तसेच या अवैध होर्डिंग्जकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अशी तोफही त्यांनी डागली. पालिका प्रशासन आणि अनाधिकृत होर्डिंगमालक यांचे आर्थिक देणेघेणे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Pimpri-Chinchwad Politics
Pune News: पुण्यात मुलांच्या नव्हे, मुलींच्या टोळीने घातला राडा; नंतर झाली उपरती !

होर्डिंग अपघाताला जबाबदार कोण?

पाच निष्पापांचे बळी घेणाऱ्या किवळेतील कालच्या होर्डिंग दुर्घटनेला सर्वस्वी पिंपरी महापालिका जबाबदार असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून उभे केलेले बेकायदा दोन मजली जाहिरात फलक हे पालिकेच्या आकाशचिन्ह विभागातील खाबुगिरीचे दर्शन आहे, असे ते म्हणाले.

जोपर्यंत अनधिकृत, दुमजली फलक काढले जात नाहीत तोपर्यंत या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची जबाबदारी पालिकेची असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. काल पाच बळी जाण्यास पालिकेचा आकाशचिन्ह विभाग आणि तेथील अधिकाऱ्यांची मानसिकता जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

Pimpri-Chinchwad Politics
Pimpri-Chinchwad : होर्डिंग दुर्घटनेनंतर प्रशासनाला आली जाग; आता सर्व होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

होर्डिंगला छिद्र नसल्याने ते कोसळले?

होर्डिंग घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी शेखर सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आज केली. होर्डींग्ज उभारणीतील तांत्रिक चूक त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली. दुर्घटनाग्रस्त होर्डिंग हे त्याला छिद्र नसल्य़ामुळे कोसळल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हवा जाऊ शकणारी अशी छिद्रे नसलेली होर्डिंग्ज धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

आकाशचिन्हच्या अधिकाऱ्यांमुळे होर्डिंग दुर्घटना?

आकाश चिन्ह परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे कालची जीवघेणी होर्डिंग दुर्घटना घडल्याचा आरोप एमआय़एमचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केला. त्यांच्या हलगर्जीपणामुळे शहारत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अनधिकृत होर्डिंग उभारले जात आहेत, असेही ते म्हणाले.

होर्डिंग उभारणी ही घेतलेल्या परवानगीपेक्षा अधिक आकारात व संख्येने केली जात असल्याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली, त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Pimpri-Chinchwad Politics
Maan News : 'महाविकास'ने राजकिय आकसातून जिहे कटापूरचे टेंडर रखडवले : जयकुमार गोरे

कालच्या होर्डिंग दुर्घटनेला पिंपरी महापालिका प्रशासन आणि त्यांच्या आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी तथा आपचे चेतन बेंद्रे, ब्रम्हानंद जाधव, रोहित सरनोबत, डॉ.अमर डोंगरे, सीता केंद्रे आणि कमलेश रणवरे यांनीही केला आहे. तसेच त्याला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com