Ravindra Dhangekar : नाथाचीवाडीतील मातीत बालपण गेलेले धंगेकर चौथे आमदार

Kasba By Election Result : कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासीक विजय
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Pune News : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासीक विजय झाला आहे. धंगेकरांनी ११ हजार मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला.

दौंड तालुक्यातील नाथाचीवाडीच्या मातीत बालपण गेलेले आमदार रवींद्र हेमराज उर्फ दत्तात्रेय धंगेकर हे चौथे आमदार आहेत. धंगेकर यांच्या रूपाने दौंडला दुसरा आमदार मिळाला असला तरी नाथाचीवाडीशी नाळ जोडलेले धंगेकर हे चौथे आमदार आहेत. त्यामुळे येथील मातीचा राजकीय गुणधर्म काही वेगळाच असल्याची चर्चा येथे सुरू आहे.

Ravindra Dhangekar
Shivsena : बळकटी न देता भानगडीच जास्त, बाजोरियांची हकालपट्टी; जाधव नवे संपर्कप्रमुख !

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर हे विजयी झाले. या विजयाचे दौंड तालुक्यात स्वागत होत आहे. धंगेकर यांचे मूळ गाव असलेल्या नाथाचीवाडीतील ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले आहे. दौंडचे राहुल कुल (भाजप) व रवींद्र धंगेकर (काँग्रेस) असे दोन आमदार दौंडला मिळाले आहेत.

जनता दलाचे माजी मंत्री दादा जाधवराव (पुरंदर) आणि माजी आमदार शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) यांचा जन्म नाथाचीवाडीतील आहे. नागवडे यांचे प्राथमिक शिक्षण नाथाचीवाडीत झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर (हडपसर) यांचे बालपण येथे गेले आहे. धंगेकर यांचा जन्म व शिक्षण नाथाचीवाडीतील आहे. धंगेकर यांच्या विजयाने नाथाचीवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला गेला आहे.

बाळासाहेब शिवरकर यांचे वडील विठ्ठलराव शिवरकर यांनी येथे माटोबा विद्यालयाची स्थापना केली आहे. पुणे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शंकरराव इनामके यांच्यामुळे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची एक सभा १९६० साली येथे झाली आहे.

बोरीपार्धीतील (ता.दौंड) काकासाहेब थोरात हे नोकरीनिमित्त मुंबईला गेले आणि तेथे आमदार झाले. धंगेकर यांच्या विजयाने अशाच प्रकारच्या इतिहासाची पुनरावृत्ती आज दौंडकरांनी अनुभवली.

Ravindra Dhangekar
Devendra Fadanvis; मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा पुर्नविकासाचा सरकारचा प्रस्ताव!

रवींद्र धंगेकर यांचा जन्म नाथाचीवाडी (पिंपळगाव) येथे झाला आहे. १९६५ दरम्यान हेमराज धंगेकर यांना त्यांच्या आत्याने दत्तक घेतले होते. धंगेकर यांचे झाडगे असे मूळ आडनाव आहे.

धंगेकर यांची शेती, घर अद्यापही नाथाचीवाडी येथे आहे. हेमराज हे सोने-चांदीचे कारागीर म्हणून ओळखले जात होते. नाथाच्यावाडीतील जिल्हा परिषद शाळेत धंगेकर यांचे प्राथमिक तर माटोबा विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले.

पैलवान असलेले रवींद्र यांनी राजकारणात हार न मानता तिसऱ्यांदा कुस्ती चितपट केली आहे. त्यांच्या विजयासाठी वाडीतील काही ग्रामस्थ कसब्यात तळ ठोकून होते. आपला माणूस आमदार झाला अशीच भावना येथील ग्रामस्थांमध्ये आज पहायला मिळाली.

शिक्षण झाल्यानंतर रवींद्र पुण्यात गेले. सामाजिक कार्याची आवड असलेल्या धंगेकर यांनी काही वर्षातच आपला जम बसविला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात चौथ्या वेळेस सुद्धा नगरसेवकपद टिकून आहे.

Ravindra Dhangekar
Chandrashekhar bawankule : भाजपचा कसब्यात पराभव का झाला? बावनकुळेंनी सांगितलं कारण...

धंगेकर यांचे कोणीही पुर्वज राजकारणात नसताना भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्यात त्यांनी बाजी मारल्याने त्यांचे कौतुक होत आहे. रवींद्र यांची कर्मभूमी पुणे असली तरी त्यांची गावाशी नाळ जोडलेली आहे. गावातील सुख दुःखात, यात्रेत, सार्वजनिक कार्यक्रमात ते सहभागी असतात.

गावातील शाळा, व्यायाम शाळा, स्मशानभूमीला त्यांनी निधी मिळवून दिला आहे. अशी माहिती संजय इनामके, नितीन म्हेत्रे, ग्रामविकास अधिकारी विकास झाडगे यांनी दिली. धंगेकर हे शाळेला सतत मदत करत असतात. गेल्यावर्षी त्यांनी शाळेला विविध सुविधांसाठी साडेतीन लाख रूपयांची मदत केली आहे. असे नाथाचीवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद नातू यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com