बिबट्या सफारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात होणार बैठक

बिबट्या सफारी हा प्रकल्प जुन्नरलाच व्हावा,अशी माझ्यासर सर्वपक्षीय मागणी आहे. त्याचा सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी आमदार बेनकेंनी केली आहे.
shivsena, ncp
shivsena, ncpsarkarnama

जुन्नर : जुन्नरच्या प्रस्तावित बिबट्या सफारीसाठी लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री आणि वनमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत बैठक होणार आहे. अशी माहिती आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी दिली.

shivsena, ncp
'द कश्मीर फाईल्स' नंतर आता 'लखीमपूर फाईल्स'?

आमदार बेनके म्हणाले, "2016 पासून बिबट्या सफारी जुन्नर मध्ये प्रस्तावित आहे. मात्र अचानक अर्थसंकल्पात पुणे वनविभागामधील बिबट्या सफारीसाठी 60 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. यामुळे जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी नाराजी वक्त केली. ही नाराजी आणि नागरिकांच्या भावना मी विधानसभा अधिवेशना दरम्यान सभागृहात आक्रमकपणे मांडल्या. तसे पत्र देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. या पत्रावर अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यावर उच्चस्तरिय बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार लवकरच बैठक होऊन जुन्नर बिबट्या सफारीसाठी सकारात्मक निर्णय होईल. त्यासाठी मी प्रयत्नशिल आहे, असे बेनके यांनी सांगितले.

काय आहे पत्रात?

बिबट्या सफारीचा मुद्दा घेऊनच आम्ही निवडणका लढलो. मात्र अर्थसंकल्पात बारामतीच्या बिबट सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केल्याने, जुन्नरची बिबट सफारी बारामतीला होणार या घोषणेमुळे जुन्नरची जनता व्यथित झाली आहे. यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणुन मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल.

shivsena, ncp
रामदास आठवले म्हणाले, कोल्हेंनी माझ्या लग्नात लाडू वाटले होते...

२०१६ साली बिबट सफारी प्रकल्प जुन्नरला व्हावा, यासाठी तत्कालीन वनमंत्री यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यास शासनाने अनुकूलता दाखवून संबधित विभागाचे सचिव, वास्तुविशारद यांनी आंबेगव्हाण येथील जागेची पाहणी करत, डिपीआर साठी दिड कोटी रुपये मंजूर केले. त्यातील ६५ लाख अदा करणार होते. मात्र, ते झाले नाहीत. व हा प्रकल्प पुढे गेला नाही. तेव्हापासून जनतेला या प्रकल्पाबाबत आश्‍वस्त केल्याने या प्रकल्पाबाबत जनतेमध्ये उत्सुकता होती. परंतू बजेट मध्ये हा प्रकल्प बारामतीला होणार या घोषणेमुळे जुन्नरची जनता व्यथित होऊन, जनक्षोभ उसळला. शासनाचे धोरण जुन्नरला अनुकूल असताना, हा प्रकल्प बारामतीला नेण्याचा घाट का घातला जात आहे? अशी लोकभावना झाली आहे. यामुळे जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. यामुळे हा प्रकल्प जुन्नरलाच व्हावा. अशी माझ्यासर सर्वपक्षीय मागणी आहे. त्याचा सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी बेनकेंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com