नगरसेवक होणाऱ्या इच्छुकांची धडधड वाढली : तीन सदस्यीय प्रभागाचा न्यायालय आढावा घेणार
महाविकास आघाडीतील नेतेsarkarnama

नगरसेवक होणाऱ्या इच्छुकांची धडधड वाढली : तीन सदस्यीय प्रभागाचा न्यायालय आढावा घेणार

उच्च न्यायालयात (Mumbai High Court) म्हणणे सादर करण्याचा राज्य सरकारला आदेश

पुणे : महापालिका (Corporation elections 2022) आणि नगरपालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणाऱ्या याचिकांची दखल घेऊन याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य सरकार दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारने चार सदस्यांऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग केला आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांसाठी जागावाटप योग्य व्हावे यासाठी हा निर्णय़ घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीतील नेते
तीन पक्षांच्या सरकारकडून तीनचा प्रभाग अन् नगरसेवकांची वाढली डोकेदुखी

तीन सदस्यांचा प्रभाग होणार हे गृहित धरून निवडणूक आयोगाने आणि इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. आता त्या विरोधात न्यायालयात वाद गेल्याने त्यावर लवकर निर्णय येईल का आणि आला तर राज्य सरकारचा आदेश कायम राहील का, अशा दोन्ही शंका आहेत. त्यामुळे तीन सदस्यांचा प्रभाग आपल्याला लढायचा आहे, असे समजून तयारी करणाऱ्यांच्या मनात पुन्हा धडकी भरली आहे.

न्यायमूर्ती ए. ए. सय्यद व न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. राज्य सरकारला म्हणणे सादर करण्याबाबतच्या नोटिसा आज (ता. १६) जारी करण्यात आल्या आहेत. नोटीस काढल्यापासून दोन आठवड्यात म्हणणे सादर करावे, असे नोटीसमध्ये नमूद आहे. याबाबत परिवर्तन संस्थेचे तन्मय कानिटकर आणि पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्यावतीने अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दोन याचिका उच्चन्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यांच्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला. भापकर यांच्या याचिकेत ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार विभाग सभा घेण्याचे नियम आधी तयार करा आणि तोपर्यंत बहुसदस्यीय पद्धतीला स्थगिती द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतील नेते
पुण्यानंतर पिंपरीतूनही तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला उच्च न्यायालयात आव्हान

कधी दोन सदस्यांचा तर कधी चार सदस्यांचा प्रभाग हा लोकशाहीचा राजकारणासाठी वापर कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर येथे होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात ही याचिका महत्त्वाची ठरणार आहे.

परिवर्तन आणि मारुती भापकर यांच्या याचिकेत अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यासह अ‍ॅड.अजित देशपांडे, अ‍ॅड. अक्षय देसाई, अ‍ॅड. मदन कुऱ्हे, अ‍ॅड. तृणाल टोणपे आणि अ‍ॅड. अजिंक्य उडाणे काम पाहत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in