Rasane On Dhangekar : "रवीभाऊ, बोलताना भान ठेवा, आपण इतके मोठे नाही की..." ; रासनेंनी धंगेकरांना सुनावलं!

Hemant Rasane On Ravindra Dhangekar : धंगेकरांनी फडणवीसांवर टीका करताच रासनेंनी धंगेकरांना लक्ष्य..
Hemant Rasane On Ravindra Dhangekar : Devendra Fadnavis
Hemant Rasane On Ravindra Dhangekar : Devendra FadnavisSarkarnama

भाजपचा गड मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemnat Rasne) यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ११ हजार ४० मतांच्या चांगल्या मताधिक्याने विजय खेचून आणला. यानंतर यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये टीका टिपण्णी थांबताना दिसत नाही. धंगेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर आता, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, रविंद्र धंगेकर यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांना लक्ष्य केले होते. "फडणवीस भाजपला रसातळाला घेऊन जातील, त्यांनी निवडणुकीत किती पैसा वाटला, किती काही केलं, तरी हा क्षणिक आनंद आहे. त्यांची सत्ता गेल्यावर लोक नमस्कार देखील घालणार नाही," असा जोरदार वार धंगेकरांनी केला होता.

Hemant Rasane On Ravindra Dhangekar : Devendra Fadnavis
Ravindra Dhangekar News : भविष्यात काँग्रेस सोडणार का? धंगेकरांनी स्पष्टच सांगितले

"विरोधकांना राजकीय आयुष्यातून उद्धवस्त करणं, हाच एकमेव अजेंडा घेऊन देवेंद्र फडणवीस काम करतात. लोकशाहीची हत्या कशी करतात, ते फडणवीसांकडून शिकावं. भाजपच्या हेमंत रासनेंचा त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी पराभूत केलं आहे," असेही रविद्र धंगेकर म्हणाले होते.

यावर आता कसब्यातील भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी ट्विट करत धंगेकरांना लक्ष्य केले आहे. धंगेकरांना त्यांनी खोचक सल्ला दिला आहे. रासने ट्वीट मध्ये धंगेकरांना उद्देशून म्हणतात, "रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन आपण मा. देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले.आपण ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व मा.देवेंद्रजींनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी बोलताना थोडसं तारतम्य बाळगा. मा. देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे, इतके मोठे आपण नक्कीच नाहीत.

Hemant Rasane On Ravindra Dhangekar : Devendra Fadnavis
Chandrakant Patil: खचून जाऊ नका...; कसब्याच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस

रासने पुढे म्हणतात, "कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा. बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत." असं ट्विटमध्ये लिहिलं आहे. रासनेंच्या या ट्वीटमुळे आता कसब्याचा विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यात वादाचं नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com