राष्ट्रवादीचे सूचक मौनाचे राजकारण अन्‌ हर्षवर्धन पाटलांची हॅट्‌ट्रीक!

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी ॲड. हेमंत नरूटे यांची बिनविरोध निवड
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूचक मौनाच्या राजकारणामुळे इंदापुरात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तीन निवडणुका बिनविरोध करत हॅट्‌ट्रीक साधली आहे. कारखान्यांच्या दोन निवडणुकांपाठोपाठ आज (ता. ११ नोव्हेंबर) झालेल्या पंचायत समिती उपसभापतीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, त्यामुळे उपसभापतीही बिनविरोध निवडण्यात पाटील यांना यश आले आहे. (Adv. Hemant Narute Unopposed electied Deputy Chairman of Indapur Panchayat Samiti)

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी ॲड. हेमंत नरूटे यांची बिनविरोध निवड झाली. निर्धारीत वेळेत राष्ट्रवादीकडून अर्ज न आल्याने नरुटे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, पंचायत समितीत पदाधिकारी जिंकण्याइतपत संख्याबळ राष्ट्रवादीकडे नसले तरी कार्यकर्ते चार्ज राहण्यासाठी लढण्याची जिद्द दाखवायला हवी होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण, पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीच्या मागील निवडणुकांत राष्ट्रवादीने उमेदवार दिले होते. इंदापूर पंचायत समितीत हर्षवर्धन पाटील गटाकडे नऊ जागा असून राष्ट्रवादीकडे पाच जागा आहेत. तसेच, उपसभापतीला मिळणारा काळ पाहूनही राष्ट्रवादीने लढण्याचा विचार केलेला नसावी, असेही सांगितले जात आहे.

Harshvardhan Patil
बाळासाहेब पाटलांसमोरच गडकरी म्हणाले...‘सहकार आयुक्त असा नंदीदेव असतो की...’

राष्ट्रवादी काँग्रेसने नुकत्याच झालेल्या कर्मयोगी कारखाना निवडणुकीतही पॅनेल दिले नव्हते. तत्पूर्वी नीरा-भीमा कारखानाही बिनविरोध झाला होता. इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत आजही राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने ही निवडणूकदेखील बिनविरोध झाली आहे. त्यामुळे पंचायत समितीवर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची निर्विवाद सत्ता राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूचक मौनाच्या राजकारणाची मात्र तालुक्यात चर्चा रंगली आहे.

Harshvardhan Patil
पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदार भाग्यवान आहेत...मी विदर्भात तीन कारखाने काढले अन्‌...

दरम्यान, उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर ॲड. हेमंत नरूटे यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप नेते मारुतीराव वनवे, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, उपाध्यक्ष सत्यशील पाटील, माजी सभापती करणसिंह घोलप, वाहतूक संघाचे अध्यक्ष रघुनाथ राऊत, भाजप नेते माऊली चवरे, गजानन वाकसे, महेंद्र रेडके, पंचायत समिती सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

Harshvardhan Patil
आढळराव केंद्रात मंत्री होणार...कसे ते त्यांना आणि आम्हालाच माहीत : भाजप पदाधिकाऱ्याची गुगली

दिवंगत खासदार कर्मयोगी शंकरराव पाटील, दिवंगत आमदार राजेंद्रकुमार घोलप यांच्या संस्काराप्रमाणे इंदापूर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून साडेचार वर्षांत नावलौकिक वाढेल, असे काम केले आहे. पंचायत समितीचे नूतन उपसभापती ॲड. हेमंत नरुटे हेदेखील पंचायत समितीचा नावलौकिक वाढविण्याचे काम प्रभावीपणे करतील. मिनी आमदारकीची निवडणूक समजली जाणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या भागात संवाद दौरे काढून केलेली कामे जनतेपर्यंत पोचवावीत. आपल्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची उदघाटने, भूमिपूजने यांचे आयोजन केल्यास काही ठिकाणी आम्हीही सहभागी होऊ. आगामी निवडणुकीत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपची सत्ता कायम राहील, असा विश्वासही या वेळी पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com