दिव्यांगांची व्यथा ऐकून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील झाले अस्वस्थ!

क्षणाचाही विलंब न लावता आमदार निधीतून पात्र दिव्यांग व्यक्तींचा निर्वाहभत्ता देण्याची व्यवस्था करतो, असे त्यांनी सांगितल्यानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
Dilip walse Patil
Dilip walse PatilSarkarnama

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील ११३ दिव्यांगाना २०२०-२१ या वर्षातील पुणे जिल्हा परिषदेमार्फत पाच टक्केप्रमाणे सहा हजार रुपये निर्वाह दिव्यांग भत्ता मिळालेला नाही. गेली सहा महिने संघटना यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेत हेलपाटे मारत आहे. पण, आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडले नाही. आर्थिक चंचणीमुळे दिव्यांगांचे हाल सुरु आहेत, अशी व्यथा दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या कानावर नाराजीच्या सुरात घातली. दिव्यांग बांधवांची व्यथा ऐकून वळसे पाटीलही अस्वस्थ झाले होते. क्षणाचाही विलंब न लावता आमदार निधीतून पात्र दिव्यांग व्यक्तींचा निर्वाहभत्ता देण्याची व्यवस्था करतो, असे त्यांनी सांगितल्यानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. (Hearing the plight of handicapped, Home Minister Dilip Walse Patil became upset)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे वयोश्री योजना व दिव्यांग योजनेंतर्गत मोफत साहाय्यक साधने शिबिर नियोजन बैठकीनंतर आंबेगाव तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष समीर टाव्हरे, सुनील दरेकर, ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजीव सदस्या पूर्वा वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Dilip walse Patil
शरद पवार, अजितदादांना बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आमंत्रण!

जिल्हा परिषदेमार्फत पाच टक्केप्रमाणे सहा हजार रुपये दिव्यांग भत्ता प्रत्येक पात्र लाभार्थी यांना दरवर्षी दिला जातो. परंतु २०२०-२१ या वर्षातील दिव्यांग भत्ता वाटप यादीतील ११३ दिव्यांग लाभार्थ्यांचा निर्वाह भत्ता मंजूर असतानाही अद्याप वाटप केला नाही. यासंदर्भात संघटना गेली सहा महिने जिल्हा परिषदेत हेलपाटे मारत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनाही शिष्ठमंडळ भेटले. त्यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना कडक सूचनाही दिल्या होत्या. पण अर्थ व समाज कल्याण विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. अधिकारी वर्ग भेटीसाठी गेलेल्या दिव्यांगांना वेळही देत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी तक्रारही समीर टाव्हरे यांच्यासह दिव्यांगांनी केली.

Dilip walse Patil
चंद्रकांत पाटलांसमोरच भाजप नगराध्यक्षाने पाणी योजनेचे क्रेडीट दिले अजितदादांना!

आंबेगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग लाभार्थ्यांची यादी ताबडतोब सादर करा. आमदार निधीतून पात्र असलेल्या ११३ दिव्यांग व्यक्तींचा निर्वाहभत्ता सहा लाख ७८ हजार रुपये बँक खात्यात तातडीने जमा केला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले. या वेळी दिव्यांग संघटनेचे ललिता बोराडे, मंगल धोत्रे, निराली फरान, पुनम काळे उपस्थित होते. यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की याबाबत लगेच माहिती सांगणे शक्य नाही. माहिती घेऊन सांगतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in