मित्राच्या अंगावरील २५ तोळे सोनं बघून नियत फिरली.. खून करून मृतदेह फेकला नदीत...

Crime : कॉफीतून गुंगीचे औषध दिले.
Crime news Pune Latest News
Crime news Pune Latest NewsSarkarnama

पुणे : मित्राच्या अंगावर असलेले २५ तोळे सोनं बळकावण्यासाठी बिबवेवाडीमधील वास्तुशास्त्र सल्लागाराचा त्याच्याच मित्राने अपहरण करून खून केला. त्यानंतर मृतदेह नीरा नदीत फेकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून वास्तुशास्त्र सल्लागाराच्या मित्रासह साथीदाराला अटक केली आहे.

नीलेश दत्तात्रेय वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. या प्रकरणी वरघडे यांचा मित्र दीपक जयकुमार नरळे (रा. नऱ्हे, आंबेगाव) आणि त्याचा साथीदार रणजित ज्ञानदेव जगदाळे (वय २९) यांना अटक करण्यात आली आहे. (Crime news Pune Latest News)

Crime news Pune Latest News
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्येच का जातात?; राज ठाकरेंचा सवाल...

१६ ऑक्टोंबर रोजी वरघडे घरी न आल्याने त्यांची वहिनी रूपाली रूपेश वरघडे (वय ४०) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरघडे यांना सोन्याच्या दागिन्यांची आवड होती. घटनेच्या दिवशी त्यांनी २५ तोळे सोन्याचे दागिणे घातले होते.

या दागिन्यांवर नजर ठेवत दोन्ही आरोपी वरघडे यांना एका पूजेसाठी नऱ्हे परिसरात नेले. तेथे त्यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी वरघडे यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून देऊन आरोपी पसार झाले.

Crime news Pune Latest News
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; १० जणांना वाहनाने चिरडले

१६ ऑक्टोबरला वरघडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार नरळेला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीत पोलिसांना तो वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करत होता. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी नरळे आणि जगदाळे यांनी खून केल्याची कबुली दिली.

सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोप आढळून आले आहेत. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे आदींनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला.

दरम्यान,आरोपींनी नीलेश यांचा मृतदेह नीरा नदीत टाकून दिल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींकडून कार, दोन दुचाकी, सोन्याचे दागिने, मोबाईल असा १९ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in