Trupti kolte : हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित ; 'या' कारणामुळे झाली कारवाई

Trupti kolte news : जमिनीच्या प्रकरणात कोलते यांच्याकडून चुकीचे आदेश करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.
 Trupti kolte
Trupti kolte sarkarnama

Trupti kolte news : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य शासनाच्यावतीने शुक्रवारी रात्री काढण्यात आले.

हडपसर येथील जमिनीच्या प्रकरणात कोलते यांच्याकडून चुकीचे आदेश करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.

या शिवाय कोविड काळात औषध खरेदीतील अनिमितता आणि निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी कोलते यांच्याविरोधात होत्या, त्याआधारे कोलते यांना निलंबित करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.

तृप्ती कोलते गेल्या दोन वर्षापासून हवेली तहसीलदार म्हणून काम पाहत आहेत. संपूर्ण पुणे शहर आणि शहरालगतच्या ग्रामीण भागाचा हवेली तालुक्यात समावेश आहे. त्यामुळे हवेली तहसीलदार हे पद कामाच्यादृष्टींने संवेदनशील मानले जाते.

 Trupti kolte
Ambedkar : अठरापगड जातींतील लोक पुजारी का नाहीत ? गोंडपिंपरीत आंबेडकर कडाडले...

हडपसर येथील जमीन प्रकरणात तत्कालीन महसूल मंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांचे आदेश लक्षात न घेता निर्णय देताना अनियमितता करण्यात आल्याचा प्रमुख आरोप कोलते यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

कोविड काळात करण्यात आलेली औषध आणि आवश्यक साहित्य खरेदी प्रकरणात शासनाने घालून दिलेली विहित नियमावली न पाळता त्यात अनियमितता झाल्याचा आरोप निलंबनाच्या पत्रात करण्यात आला आहे. निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्याचेही निलंबन आदेशात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com