Hasan Mushrif ED Raid : मुश्रीफांचे व्यावसायिक 'पार्टनर'ही अडचणीत; पुण्यात घर, कार्यालयावर छापेमारी

NCP Hasan Mushrif ED Raid : मला नाऊमेद करण्यासाठी हे सारे सुरु....
Hasan mushrif
Hasan mushrifSarkarnama

Hasan Mushrif ED Raid News: राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडी (सक्तवसुली संचलनालय)ची छापेमारी सुरु आहे. मुश्रीफ यांच्या पुणे, कागल निवासस्थानी ही छापेमारीची कारवाई करण्यात येत आहे.यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना घोटाळा आरोप प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली जात आहे. याचवेळी मुश्रीफांचे व्यावसायिक भागीदार व ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावरही ईडीने छापा टाकला आहे.

हसन मुश्रीफां(Hasan Mushrif) सह चंद्रकांत पाटील यांच्या ब्रिस्क कंपनीच्या कार्यालयावरही कारवाई सुरु आहे. चंद्रकांत गायकवाड ब्रिस्क इंडिया कंपनी सेक्रेटरी आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना ब्रिस्क इंडिया कंपनीनं उभारला होता आणि आप्पासाहेब नलावडे कारखाना देखील ही कंपनी चालवत होती. कोलकत्तास्थित कंपन्यांमधून पैसे मुश्रीफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाडचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चंद्रकांत गायकवाड यांचं घर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात आहे. या ठिकाणी सध्या कारवाई केली जात आहे.(ED and Income Tax Raid at NCP Leader Hasan Mushrif Residence)

Hasan mushrif
BJP; राज्यातील सत्तांतर नाट्य हे भाजपचेच 'ऑपरेशन'

ईडीने मुश्रीफ यांचा मुलगा आणि मुलीच्या घरावरही छापे टाकले आहे. पुण्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चंद्रकांत गायकवाड यांच्यावर छापे टाकले आहे. कोंढवा,कोरेगाव पार्क आणि गणेशखिंड रोडवर छापेमारी सुरू आहे. चंद्रकांत गायकवाड (Chandrakant Gaikwad) हे मुश्रीफांच्या भागीदार आहे. तर, मुश्रीफांचे समर्थक प्रकाश गाडेकर यांच्या घरावर ही छापा पडला आहे. सांगाव रोडवरील त्यांच्या घरी ईडी पथक दाखल झालं आहे.

हसन मुश्रीफ यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु असून कोल्हापूर आणि पुण्यात 2 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 20 अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल आहेत. मुश्रीफांसह शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही माहिती समजताच कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे.

हसन मुश्रीफ ईडी कारवाईवर काय म्हणाले...

यापूर्वीही तपास यंत्रणांनी माझी चौकशी केली आहे. मी त्यांना सर्व माहिती दिली आहे. आता पुन्हा कशासाठी छापे टाकले, हे समजत नाही. मला नाऊमेद करण्यासाठी हे सारे सुरु असून गलिच्छ राजकारण सुरु आहे. माझे सहकारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत आहेत. कार्यकर्त्यांनी शांत राहावे असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे. अस्लम शेख व माझ्यासारख्या विशिष्ट समाजातील लोकांवर कारवाई केली जात आहे असे मुश्रीफ म्हणाले.

Hasan mushrif
Sanjay Raut News: मुश्रीफांवरील कारवाईवर संजय राऊत म्हणतात..; जाधव, गवळींना...

काय आहे प्रकऱण?

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आज ईडीने छापे टाकले आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ईडी अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in