तुमचा त्रास कमी झाला का? राम शिंदेंच्या प्रश्नाने हर्षवर्धन पाटलांना हसू अनावर

Ram Shinde| Harshvardhan Patil|अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर बारामती दौऱ्याची जबाबदारी राम शिंदे यांच्यावर देण्यात आली आहे.
Ram Shinde| Harshvardhan Patil|
Ram Shinde| Harshvardhan Patil|

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. तर बारामतीचे प्रभारी म्हणून भाजपने राम शिंदे यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. सीतारमण यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी इंदापुरात राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी घडलेला प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राम शिंदे यांनी, "हर्षवर्धन पाटील साहेब, तुम्हाला होत असलेला त्रास आता कमी झाला का? नसेल झाला तर आपण आपल्याकडच्या पान्याने तो टाईट करु", असं हर्षवर्धन पाटील यांच्या कानात विचारले. राम शिंदेंचा हा हर्षवर्धन पाटीलही खुदकन गालात हसले. सभेला उपस्थित लोकांनाही राम शिंदेंना काय म्हणायचं ते कळलं आणि सभागृहातही हशा पिकला. या सगळ्या प्रसंगासाठी हर्षवर्धन पाटलांचं एक जुनं वक्तव्य कारणीभूत ठरलं, ते म्हणजे 'भाजपमध्ये आल्यापासून सुखाची झोप लागले, कसलंच टेन्शन नाही!'

Ram Shinde| Harshvardhan Patil|
Whatsapp स्टेटसमधून रामराजेंचा आमदार गोरेंना चिमटा, दिलं 'हे' उत्तर

नक्की काय घडलं?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे बारामती लोकसभेचे प्रभारी राम शिंदे यांची इंदापूरमध्ये बैठक पार पडली. यावेळी बोलताना राम शिंदें म्हणाले की, "हर्षवर्धनजी, तुमचा त्रास आता कमी झालाय का? नसेल झाला तर आपण आपल्याकडील पान्याने आपण टाईट करु", असा टोला राम शिंदे यांनी मारला. पण हे ऐकताच हर्षवर्धन पाटलांनाही हसू आवरलं नाही. तर उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला.

राम शिंदे असं बोलण्यामागचं कारणही तसचं आहे. गेल्या वर्षी एका कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला निवांत झोप लागते, हर्षवर्धन पाटील यांनी असे विधान त्यांनी लोणावळ्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. इतकचं नाही तर किती दिवस बारामतीचा त्रास सहन करायचा, असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. हर्षवर्धन पाटलांच्या या विधानावरुन राम शिंदेंनी भर कार्यक्रमातच त्यांना असा सवाल केला. राम शिंदे यांच्या प्रश्नातीलतो पाना कोणता? अशी चर्चा सभागृहात सुरु झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in