देवेंद्र फडणवीस हे शब्द पाळणारे नेते : हर्षवर्धन पाटील

देवेंद्र फडणवीस हे शब्द पाळणारे नेते : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करताच खडकवासल्याचे पाणी इंदापूरला आले. फडणवीस हे शब्द पाळणारे आहेत. अपक्ष उमेदवार आप्पासाहेब जगदाळे यानी 14 लोकहिताच्या मागण्या पुढे करून आपली उमेदवारी मागे घेऊन पाठिंबा दिला आहे.

आप्पासाहेब जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी आपल्या 50 टक्के मागण्या मान्य होतील. मात्र मतदारांनी आपणास विक्रमी मताधिक्याने विजयी करून पहिल्या रांगेत बसण्याची संधी दयावी, या संधीचे सोने करून तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

अपक्ष उमेदवार आप्पासाहेब जगदाळे यांच्या पुढाकाराने जुन्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजारसमिती प्रांगणात विराट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आप्पासाहेब जगदाळे, अशोकघोगरे, बाळासाहेब घोलप, छगनराव भोंगळे, संजयसिंह निंबाळकर, भाऊसाहेब सपकळ, प्रदिप जगदाळे, अरविंद वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला. 5 वर्षात पाणी देण्यास विद्यमान आमदार भरणे कमी पडल्याने आमचा त्यांना विरोध आहे, मात्र पक्षास आमचा विरोध नसून आम्ही भाजप प्रवेश केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, आप्पासाहेब जगदाळे यांच्या मागण्यांपैकी लाकडी निंबोडी पाणी पुरवठा योजनेस तत्वतः मान्यता आहे. मात्र त्यास राज्यपाल यांची अनुमती घेणे गरजेचे आहे. निरा भीमा स्थिरीकरण प्रकल्पात उद्धट जवळ सोनथळी येथून 25 टीएमसी पाणी लिफ्टने उचलूनकालव्यात  सोडण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. निरा, भीमा नदीवरील बंधाऱ्यांना स्वयंचलित दरवाजे बसवले जातील. निराडावा, खडकवासला कालव्याची वहन क्षमता, रुंदी व खोली वाढवणे यावर भर दिला जाईल. निरा नदीत उन्हाळ्यात पाणी रहावे तसेच 22 गावांना बारमाही पाण्यासाठी प्रयत्न केले जातील. उद्धट बंधाऱ्यात 3, सणसर कटचे 3.5 व उजनी धरणातील 9.2 टीएमसी हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

निरा- भीमा नद्यांवरील प्रत्येक बंधाऱ्यावर पाणी वापर संस्था काढण्यास प्राधान्य देणार आहे. लोणी देवकर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत 20 ते 25 हजार कोटी रुपयांचे उद्योग आणून बेरोजगारी दूर केलीजाईल.  त्यासाठी सर्वांनी आपला बूथ न सोडता इंदापुरची जागा प्रथम क्रमांकाने विजयी करणे गरजेचे आहे.

यावेळी आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, सध्या हवा कुणाची व सत्ता कुणाची येणार हे सांगण्याचीगरज नाही. त्यामुळे सत्तेजवळ असलेल्या महायुतीच्या उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना सर्वोच्च मताधि- क्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्रीमती पद्माताई भोसले, पृथ्वीराज जाचक  लालासाहेब पवार, युवराज म्हस्के,मयुरसिंह पाटील , मंगेश पाटील, सुभाष काळे, भास्कर गुरगुडे, प्रशांत सूर्यवंशी, महेंद्र रेडके, दीपक जाधव, शेखर पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे तर सुत्रसंचलन प्रकाश दरदरे व मुकुंद सोनवणे यांनी केले. आभार शहराध्यक्ष माऊली वाघमोडे यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com