हर्षवर्धन पाटलांच्या खंद्या समर्थकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

तरुण व ज्येष्ठांना सोबत घेऊन विकास कामे करावीत, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काटकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.
Bhagwat Katkar join NCP
Bhagwat Katkar join NCPSarkarnama

वडापुरी (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे कट्टर समर्थक, इंदापूर तालुक्यातील वडापुरीचे माजी उपसरपंच भागवत काटकर यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांच्या उपस्थितीत पुण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पाहता तो पाटील यांना धक्का असल्याचे मानले जात आहे. (Harshvardhan Patil's supporter Bhagwat Katkar joins NCP)

Bhagwat Katkar join NCP
मित्राच्या मुलाच्या घरी स्नेहभोजन घेत नितीन गडकरींनी जपली मैत्री!

भागवत काटकर हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक होते. मात्र, त्यांनी नुकतीच पाटील यांची साथ सोडत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. भरणे यांनी काटकर यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेशानंतर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, वडापुरी गावची प्रलंबित विकासकामे लवकरच मार्गी लावली जातील. त्यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, तरुण व ज्येष्ठांना सोबत घेऊन विकास कामे करावीत, असे आवाहन भरणे यांनी काटकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.

Bhagwat Katkar join NCP
मुंबईत मराठी माणसांना केंद्राच्या आदेशाने गोळ्या घालणार, असा त्याचा अर्थ! : राऊत संतापले!

या वेळी वडापुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनुमंत जगताप, वडापुरीचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाजी तरंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब जगताप, श्रीनाथ पाणी पुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष हरिदास माने, चिंटू काटकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com