हर्षवर्धन पाटलांच्या गडाला सुरुंग, खंदा समर्थक करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Indapur|Harshvardhan patil|NCP| बारामती लोकसभा मतदार संघात हर्षवर्धन पाटील भाजपचे हे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा
Harshvardhan patil|NCP
Harshvardhan patil|NCPSarkarnama

इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून इंदापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचा खंदा समर्थक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले (Shrimant Dhole) आणि त्यांचे काही सहकारी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहे. श्रीमंत ढोले व प्रवेश करणारे इतर पदाधिकारी हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ढोले यांचा राष्ट्रवादीतील (NCP) प्रवेश हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी इंदापूरमध्ये जाणार आहेत. विशेष म्हणजे, इंदापूर पंचायत विद्यमान सभापती स्वाती शेंडे आणि युवा कार्यकर्ते दिपक जाधव हेदेखील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. म्हणून राष्ट्रवादी कडून हर्षवर्धन पाटील यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून केले जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

तर श्रीमंत ढोले आणि त्यांच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे इंदापूरात हर्षवर्धन पाटील एकाकी पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजप आता हर्षवर्धन पाटलांना बळ देण्यासाठी कोणते पाऊल उचलणार याकडे संपूर्ण इंदापूर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामती लोकसभा मतदार संघात हर्षवर्धन पाटील हे भाजपचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा होती. इंदापूर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांची पकड अजूनही कायम आहे. त्यामुळे भविष्यात हर्षवर्धन पाटील हे पवारांना कडवे आव्हान देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

कॉंग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूरमध्ये चांगला प्रभाव होता. पण ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजप मध्ये प्रवेश केला. मात्र भाजपतर्फे लढवलेली विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी थेट पवारांसमोर आव्हान उभे केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणून ओळख असणारा इंदापूर तालुक्यात भाजपला हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने तगडा नेता मिळाला. त्यामुळे भविष्यात हर्षवर्धन पाटील जर खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान देणार असतील तर आताच हर्षवर्धन पाटील यांचे यांचे निवटवर्तीय गळाला लावण्याचे राजकारण राष्ट्रवादीने सुरू केल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com