हर्षवर्धन पाटलांना आणखी एक धक्का : १५ वर्षांची सत्ता संपुष्टात; भरणे गटाची बाजी!

गेली १५ वर्षांपासून सत्ता असलेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत पाटील यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हर्षवर्धन पाटलांना आणखी एक धक्का : १५ वर्षांची सत्ता संपुष्टात; भरणे गटाची बाजी!
Indapur Primary Co-operative Credit Society electionSarkarnama

वडापुरी (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना आणखी एक धक्का बसला आहे. गेली १५ वर्षांपासून सत्ता असलेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत पाटील यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांच्या गटाने पतसंस्थेच्या २१ पैकी २१ जिंकत पाटील यांच्या गटाच्या पॅनेलला पराभवाची धूळ चारली आहे.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेसाठी ता. २४ एप्रिल रोजी ९८.६४ टक्के मतदान झाले होते. ही निवडणूक २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी झाली होती. त्याची मतमोजणी पतसंस्थेच्या कर्मयोगी शंकरराव पाटील सांस्कृतिक भवनात आज (ता. २५ एप्रिल) झाल. मतमोजणीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत २१ जागांवर दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या शिक्षक विकास पॅनेलची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे.

Indapur Primary Co-operative Credit Society election
पालिका, ZP निवडणुकीसंदर्भातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; पावसाळ्यानंतरच रंगणार रणसंग्राम

इंदापूर शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भरणे गटाच्या स्वाभिमानी शिक्षक परिवार पुरस्कृत स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलने नानासाहेब नरूटे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी हर्षवर्धन पाटील यांच्या गटाच्या शिक्षक विकास पॅनेलपुढे जोरदार आव्हान उभे केले होते. पाटील गटाकडे गेल्या १५ वर्षांपासून सत्ता होती. ती उलथवून टाकण्यासाठी भरणे गटाने मोठे परिश्रम घेतले होते. त्यात त्यांना यश येत निवडणुकीत २१ विरूद्ध ० अशा फरकाने दणदणीत विजय मिळवत पाटील गटाला जोरदार धक्का दिला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक जे. पी. गावडे यांनी काम पाहिले.

Indapur Primary Co-operative Credit Society election
राष्ट्रवादीने कोल्हापुरात कमावले कमी आणि गमावलेच जास्त!

स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलचे विजयी उमदेवार पुढीलप्रमणे : प्रशांत रामचंद्र घुले, शशिकांत किसन शेंडे, सुहास नामदेव मोरे, दत्तात्रेय अजिनाथ ठोंबरे, अनिल उत्तम शिंदे, सतीश विठ्ठल दराडे, बालाजी श्रावन कलवले, भारत तात्याराम बांडे, अजिनाथ विठ्ठल धायगुडे, संतोष दादाराम गदादे, सदाशिव सजन रणदिवे, संजय सोपान म्हस्के, सतीश सावळाराम गावडे, भाऊसाहेब जगनाथ वणवे, संतोषकुमार तानाजीराव तरंगे, दत्तात्रेय सदाशिव चव्हाण, रामचंद्र बलभीम शिंदे, संजिवनी उद्धव गरगडे, संगीता सुरेश पांढरे, सचिन भानुदास देवडे, किशोर राजाराम वाघ.

Indapur Primary Co-operative Credit Society election
आमदार शेखर निकमांबरोबरच भास्कररावांचा मलाही पाठिंबा : सुनील तटकरेंची गुगली

समर्थक शिक्षकांचा जल्लोष...

स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलने २१ पैकी एकवीस जागा जिंकल्याने समर्थक शिक्षकांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण करीत हालगीच्या तालावर शिक्षकांसह शिक्षिकांनीही जल्लोष केला. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा विजयी असो, अशा घोषणा देत या वेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.