हर्षवर्धन पाटलांना २० वर्षांत जमलं नाही, ते भरणेंनी दुसऱ्याच टर्ममध्ये करून दाखवलं!

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेस मंजुरी आणि ३४८ कोटींच्या अंदाजपत्रकाची तरतूद करत अनेक उद्दिष्ठ साध्य केली आहेत.
Dattatray Bharane-Harshvardhan Patil
Dattatray Bharane-Harshvardhan PatilSarkarnama

शेटफळगढे (जि. पुणे) : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेस मंजुरी आणि ३४८ कोटींच्या अंदाजपत्रकाची तरतूद करत अनेक उद्दिष्ठ साध्य केली आहेत. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांना २० वर्षांत जे जमले नाही, ते भरणे यांनी आमदारकीच्या दुसऱ्याच टर्ममध्ये करू दाखविले आहे. गेली २५ वर्षांपासून रखडलेली ही योजना मार्गी लावत भरणे यांनी शेतकऱ्यांचे कल्याण साधले आहे. तसेच, तालुक्यावरील राजकीय पकडही अधिक घट्ट करत आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर केला आहे. त्याचा फायदा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाही लोकसभेच्या निवडणुकीत होणार आहे. (Harshvardhan Patil did not get together in 20 years, bharane did it in second term!)

लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेची १९९५ पासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत चर्चा व्हायची. विधानसभा निवडणुका जवळ येताच या दुष्काळी जिरायत भागात पाणी परिषदाही झाल्या. दोन वेळा प्रशासकीय मान्यतेसाठी या योजनेचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. पण, प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना या योजनेस मंजुरी मिळवता आली नव्हती. त्याबाबतची खंत तालुक्यातील शेतकऱ्यांना होती. हाच मुद्दा उचलून धरत भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून २५ वर्षांपासून रखडलेल्या या योजनेच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
सदाभाऊंच्या संघटनेच्या कार्यक्रमास फडणवीसांसह भाजपचे डझनभर नेते हजेरी लावणार

भरणे यांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतः मंत्री असूनही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. अखेरीस या योजनेस जवळपास ३४८ कोटींचा निधी मंजूर करत याबाबतचा शासकीय निर्णय १२ मे २०२२ रोजी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भरणे यांनी काढून घेतला. त्यानंतरच योजना मंजुरीची घोषणा केली.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
हर्षवर्धन पाटलांनी आग्रह धरला अन्‌ अजितदादा आणि फडणवीस एकमेकांच्या शेजारी बसले!

या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील १० गावांतील ४ हजार ३३८ हेक्टर शेतीसिंचनाला फायदा होणार आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून या योजनेशी संबंधित असलेल्या १० गावांतील शेतकरी भरणे यांच्या भरणेवाडीतील निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करत आभार मानत आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे कल्याण करीत असताना भरणे यांनी मागील २५ वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावत स्वतःचे राज्यमंत्री असूनही राज्य सरकारमधील राजकीय वजन तालुक्यातील विरोधकांना दाखवून दिले आहे. भरणेंचे विरोधक असलेले हर्षवर्धन पाटील मंत्री असताना प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या जवळ असूनही त्यांना ही योजना मंजूर करता आली नव्हती. ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळीकतेमुळे करता आली. हे भरणे यांनी आपल्या विरोधकांना दाखवून दिले. याचीच चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी करीत आहेत.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
‘तू बोलू नकोस रे शहाण्या...तू आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेव ना’

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा ३ हजार ११० मतांनी विजय झाला होता. आता मात्र या उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांचे कल्याण होणार असल्याने भरणे यांना आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतदेखील खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यात वाढ होण्यास या योजनेच्या मंजुरीमुळे मदत होणार आहे. या योजनेत बारामती तालुक्यातील ७ गावांतील २ हजार ९९३ हेक्टर शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मताधिक्यांत वाढ होण्यास या योजनेचा फायदा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in