गुलाबराव पाटलांचा बौद्धिक विकास झालेला नाही; रुपाली पाटलांनी जखमेवर मीठ चोळलं

Gulabrao Patil| Rupali Thombare Patil| स्त्रीरोग तज्ञ हातपाय बघत नाहीत तर काय बघतात, असा सवाल विचारला आहे.
Gulabrao Patil| Rupali Thombare Patil
Gulabrao Patil| Rupali Thombare Patil

पुणे : ''आपण कार्यक्रमात कुठलं उदाहरण देत आहोत. यांच भान शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांनी ठेवलं पाहिजे. पण ते वाट्टेल ते वक्तव्य करणं, उदाहरणं ते देत आहेत. म्हणजेच महाराष्ट्र या अडाणी लोकांच्या हातात आहे आणि ते धोकादायक आहे. गुलाबराव पाटील मंत्री झाले असले तरी त्यांच्या बौद्धिक विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे त्यांना लवकरच परत पानटपरीवर चुना लावायला यायला लागणार आहे. अशी चुना लावणारी लोक महाराष्ट्राचं भवितव्य घडवू शकत नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना डिवचलं आहे.

मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं विधान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर कार्यक्रमात केलं आहे. त्यांच्या या विधानावर रुपाली पाटील यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

''स्त्रीरोग तज्ञ हातपाय बघत नाहीत तर काय बघतात, असा सवाल ठोबंरे पाटलांनी विचारला आहे. तानाजी सावंतांचा तो दौऱ्याचा पराक्रम, गुलाबराव पाटलांची ही अशी उदाहरणं, अशा गोष्टी करुन ते महाराष्ट्राची मान शरमेने झुकवत आहेत. अशा अडाणी लोकांच्या हातात आपण महाराष्ट्र दिला आहे महाष्ट्राचं वाटोळं करत आहेत. अशी वक्तव्ये करुन तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करणार असाल तर अशी राजकारणी लोक राज्य करण्याच्या लायकीची नाहीत. अशा लोकांनी सन्यांस घ्यावा, गुलाबराव पाटलांनी पुन्हा पानटपरीवर यावं ते हाच व्यवसाय चांगला करु शकतात.'' अशी टीका त्यांनी केली केला आहे.

तसेच, राजकीय पक्षातील लोकांकडून जाणीवपुर्वक महिलांबाबत अपशब्द वापरुन त्यांचे मानसिक खच्चीकरण करत आहेत. पण आम्ही त्यांना अशी उत्तरे देऊ शकतो. पण आमच्यावर राजकीय संस्कार झाले आहेत. ती राजकीय संस्कृती आणि संस्कार आम्ही जपतो, असे टोलाही रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुलाबराव पाटलांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in