Guardian Minister : पुण्याचे पालकमंत्रीपद एका दादांकडून दुसऱ्या दादांकडे !

पुण्याच्या पाकलमंत्रीपदावरून मधल्या काळात अनेक चर्चा सुरू होत्या.
Chandrakant Patil-Ajit Pawar
Chandrakant Patil-Ajit PawarSarkarnama

पुणे : पुणे गेले दोन महिने रखडलेल्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या अखेर आज जाहीर झाल्या. पुण्याचे पालकमंत्रीपद पुण्यातल्या कोथरूडचे आमदार तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) होते. त्यामुळे अजितदादांकडे असलेले पालकमंत्रीपद आता दुसऱ्या दादांकडे म्हणजे चंद्रकांतदादांकडे आले आहे.

Chandrakant Patil-Ajit Pawar
Ajit Pawar : एकमेकाला इतक्या खालच्या पातळीला जाऊन हिणवण्याचं काम करू नका रे बाबा !

पुण्याच्या पाकलमंत्रीपदावरून मधल्या काळात अनेक चर्चा सुरू होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी येणार असल्याचे सांगितले जात होते. यावरून पुण्याच्या राजकारणात बरीच चर्चा झडली होती. ही चर्चा लक्षात येतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, असे एका कार्यक्रमात स्पष्ट केले.

Chandrakant Patil-Ajit Pawar
शिवसेनेचे आणखी पाच आमदार शिंदे गटाच्या संपर्कात : अब्दुल सत्तारांचा मोठा दावा

त्यानंतर मात्र, पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे येईल याबद्दल खात्रीने सांगितले जाऊ लागले आणि या विषयावरील चर्चा थांबली. मात्र, प्रत्यक्षात पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या जाहीर होत नव्हत्या. अखेर आज या जबाबदाऱ्या जाहीर झाल्या. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची माळ चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात पडली.

Chandrakant Patil-Ajit Pawar
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना CBI कडून अटक!

यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तीन ते चार महिने चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवली.खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद होते.

२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाची राज्यातील सत्ता गेली. गेली अडीच वर्षे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार होते. या काळात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. ही जबाबदारी आता चंद्रकांतदादा यांच्याकडे आल्याने पुण्याचे पालकमंत्रीपद एका दादांकडून दुसऱ्या दादांकडे आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com