दादा, अण्णांमुळे रेल्वेमार्गालगतच्या झोपडपट्ट्यांवरील कारवाई टळली

हजारो रहिवाशांच्या डोक्यावरील छप्पर तुटण्याची भीती होती.
Railway Meeting
Railway Meeting Sarkarnama

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रेल्वेमार्गालगतच्या झोपडीधारकांना कारवाईसाठी मध्य रेल्वेने नुकत्याच नोटीसा बजावल्याने तेथील हजारो रहिवाशांच्या डोक्यावरील छप्पर तुटण्याची भीती होती. मात्र, पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याप्रश्नी सबंधित रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर काल (ता.२२) बैठक घेतल्यानंतर या कारवाईला स्थगिती देण्यात आली, अशी माहिती पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी दिली. त्यामुळे तूर्त या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनीही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्याकडे हीच मागणी आज (ता.२३) केली.

विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महापालिका आय़ुक्त कुणाल कुमार यांच्यासह मध्य रेल्वेचे अधिकारी हे कालच्या बैठकीला हजर होते. पिंपरी-चिंचवडमध्ये रेल्वेच्या जागेत आनंदनगर, हिराबाई लांडगे चाळ, कासारवाडी, फुगेवाडी, साईबाबानगर, संजयनगर, निराधार नगर, दळवीनगर, भीमनगर, लोबोरेचाळ, सॅनेटरीचाळ, दापोडी, गुलाबनगर अशा ११ झोपडपट्यांमध्ये ३५ हजार रहिवासी राहत आहेत. त्यांचा संसार रस्त्यावर येणार नाही यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, अशी विनंती आमदार बनसोडेनी या बैठकीत केली.

Railway Meeting
राणा दांपत्याचा जिवाला धोका? मुख्यमंत्री ठाकरे, राऊतांसह शिवसैनिकांच्या विरोधात तक्रार

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याप्रश्नी समन्वय समिती नेमली असून, समन्वय या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. यात रेल्वे अधिकारी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्याधिकारी असे सदस्य आहेत. या समितीची बैठक सोमवारी (ता.२५) होणार असून, त्यात पुढील निर्णय होणार आहे. तूर्त या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

Railway Meeting
पक्षश्रेष्ठींची नाराजी जुन्नरच्या नगराध्यक्षांना भोवली! शिवसेना नेत्यांनी फिरवली पाठ

दरम्यान, या झोपड्यांवर कारवाईपूर्वी तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटला पाहिजे. या नागरिकांचे 'एसआरए' योजनेत पुनर्वसन करण्याबाबत राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन सकारात्मक आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल. त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना रेल्वेच्या जागेतील घरांवर मानवतेच्या दृष्टीकोनातून तत्काळ कारवाई करण्यात येऊ नये, पावसाळा संपेपर्यंत कारवाई थांबवावी, अशी आग्रही मागणी खासदार बारणे यांनी आज रेल्वे राज्यमंत्र्यांकडे रेल्वेसंदर्भातील प्रश्नांवर आयोजित बैठकीत पुण्यात केली.त्यावर बोलताना रेल्वेराज्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोटिसा दिल्याचे सांगितले. मात्र,रेल्वेच्या जागेतील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत राज्य सरकार सकारात्मक असेल. तर, त्यासंदर्भात विचार केला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com