Gram Panchayat Election : भाजप निवडून आलेल्या सरपंचांची यादी जाहीर करणार?

भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 2 हजार 23 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावल्याचा दावा केला आहे.
Devendra Fadanvis and Eknath Shinde
Devendra Fadanvis and Eknath ShindeSarkarnama

Gram Panchayat Election Results : महाराष्ट्रातील एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे मंगळवारी (२० डिसेंबर) निकाल जाहीर झाले. या निकालानंतर भाजपने (BJP) एकूण 2 हजार 23 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेली आकडेवारी शेअर केली आहे.

भातखळकर यांच्या ट्विटनुसार राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालानुसार भाजपने दोन हजार ३४८ ग्रामपंचायतींवर, शिंदे गटाने ८४२, राष्ट्रवादी कॉंग्रेसने १ हजार ३०० ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलंय. तर शिंदे गटाने तर ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा केला आहे.

Devendra Fadanvis and Eknath Shinde
Grampanchayat News; राष्ट्रवादी काँग्रेसच नंबर वन!

भाजपने ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाबाबत केलेल्या दाव्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटव्दारे भाष्य केलंय. एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत, असं म्हणणाऱ्या मंडळींनी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी, म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्रामपंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणारं? असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे. त्यामुळे आता भाजप जिंकलेल्या 2 हजार 23 ग्रामपंचायतींची यादी जाहीर करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राज्यातील सत्तातरानंतर झालेल्या साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निकाल काल (मंगळवारी) लागला. शिवसेनेत (shivsena) फूट पडल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्यांचे काय होईल, याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. (Grampanchayat Election Result news update) ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीसाठी फार प्रतिष्ठेची बनली होती. 

पण कोणत्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नाहीत. राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या मुक्त चिन्हांमंधून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीस उभ्या राहिलेल्या संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाते. तर काही ठिकाणी प्रमुख राजकीय पक्ष स्थानिक गटांशी किंवा पॅनेलसोबत आघाड्या करतात. यामुळे राजकीय पक्षाचे नेते आपल्याच पक्षाला सर्वाधिक ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा करताना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com