निकालाबाबत मला एक टक्काही चिंता नाही; संग्राम देशमुखांचा विश्वास

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी उद्या होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
graduate constituency bjp candidate sangram deshmukh confident about victory
graduate constituency bjp candidate sangram deshmukh confident about victory

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप एकतर्फी विजय नोंदवेल. निकालाबाबत मला  एक टक्काही चिंता नाही. कारण, पाच जिल्ह्यांत भाजपने ते काम केले आहे, त्याला तोडच नव्हती, असा विश्‍वास पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केला. 

पदवीधरची मतमोजणी उद्या होईल. त्यात पाचही जिल्ह्यांमध्ये निर्विवाद आघाडी मिळेल, असा विश्‍वास देशमुख यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी विजयाबद्दल आश्‍वस्त होतो. कारण, भाजपची मतदान नोंदणीत प्रचंड आघाडी होती. पक्षाने राज्यात, मतदारसंघात खूप काम केले आहे. ज्येष्ठ मंत्री, विद्यमान मंत्री, माजी मंत्री, खासदार, आमदार, विविध मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा साऱ्यांनी प्रचंड काम केले.  

शहरांमध्ये महापौर, नगरसेवकांसह प्रत्येक कार्यकर्ता स्वतःची निवडणूक समजून राबत होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी बारकाईने काम केले. त्याचा परिणाम थेट नोंदणीत दिसून आला. त्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात यश मिळालेच, शिवाय पदवीधरांनी स्वतःहून दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी राहिला. त्याला कारण ठरले, राज्य सरकारवरची नाराजी. राज्य सरकार अपयश ठरल्याची लोकभावना आहे. शिक्षित तरुण या साऱ्याचा विचार करतात. त्यामुळे तरूण मतदारांनी खूप चांगले काम केले आहे. टक्के वाढणार हे अपेक्षितच होते आणि तो वाढलेला टक्काच मला मोठा विजय मिळवून देईल, असे देशमुख म्हणाले. 

मी पाच जिल्ह्यात फिरलो. त्यावेळी मंत्री असताना चंद्रकांतदादांनी खूप प्रश्‍न मार्गी लावल्याचे लक्षात आले. शिक्षकांचे प्रश्‍न, तरुणांचे प्रश्‍न निकाली निघाले. उद्योजकांना प्रोत्साहन दिले. बँकांकडे पाठपुरावा करून उद्योग विकास साधला. बऱ्याच उद्योजकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांचे कौतुक केले. स्पर्धा परीक्षांबाबत आता सुरु असलेल्या गोंधळावर लोक बोलत होते. काही दुष्काळी, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांकडून खूप अपेक्षा आहेत. या प्रवासात खूप प्रश्‍न समजून आले. त्यांच्यासाठी खूपसारे काम करता येईल. निवडून आल्यानंतर असे काम करू की लोक मतदार व्हायला धडपड करतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com