Lampi Skin | जनावरांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च सरकार करणार : विखे पाटलांची घोषणा

Lampi Skin | दूध आणि मांस सेवन करण्यावर काही परिणाम होईल का ? असा प्रश्न समोर येतोय
Radhakrushna Vikhe Patil|
Radhakrushna Vikhe Patil|

पुणे : लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव विशेषतः खिलार जनावरांना होत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे सूचित करण्यात आले आहे. जनावरांना अज्ञात रोगाची लागण होत असून हा लम्पी स्किन डिसीज (त्वचारोग) आहे असे तज्ज्ञांनी सांगीतले. अचानक ताप व त्वचेवर गुत्ती येत असल्याने पशुपालन करणारे शेतकरी चितांग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात आढावा बैठक आणि पत्रकार परिषद घेतली.

Radhakrushna Vikhe Patil|
Satara : 'लम्पी'च्या लसीसाठी खासदार श्रीनिवास पाटलांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

लम्पी स्किन रोगाचा महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यातील २ कोटी जनावरांपैकी जवळपास ४ हजार जनावरे लम्पी स्किन रोगाने प्रभावित झालेली आहेत. प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना राबविल्याने लम्पी स्किन रोग काही प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. या रोगाचा इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात प्रभाव कमी आहे. सर्वात जास्त प्रादुर्भाव राजस्थान आणि पंजाब आहे, असे विखे पाटील म्हणाले.

उपाययोजना म्हणून रा़ज्यातील १०० टक्के जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत १४ दिवसात एक लाख जणावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लम्पी रोगासाठी लागणाऱ्या औषधांचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे. यापुढेही सर्व लसीकरण सरकारकडून करण्यात येईल. आता दूध आणि मांस सेवन करण्यावर काही परिणाम होईल का ? असा प्रश्न समोर येतोय. आता प्राण्यांच्या आंतरराज्यात प्रवासाला बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र म्हशी वर लम्पी रोगाचा कोणताही प्रादुर्भाव नाही, असे विखे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in