पडळकरांनी केले एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन; तर अनिल परबांना करुन दिली 'ती' आठवण

एसटी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गोपीचंद पडळकरांनी (Gopichand padalkar ) त्यांच्या लढ्याचे कौतुक केलं आहे.
Gopichand padalkar
Gopichand padalkar

बारामती : आज सर्वात पहिले सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी एकजूटीनं लढा दिला. कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले,'' अशा शब्दांत भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Strike) तोडगा काढण्यासाठी सोमवारी (१०जानेवारी) बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एस.टी. विभागातील अधिकारी, संबंधित संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर कृती समितीनेही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. तर कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. त्यानंतर आज पडळकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Gopichand padalkar
भाजपला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?

''मला मंत्री अनिल परब यांना विनंती करायची आहे की, आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात, त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? तुम्ही स्वत: त्यांना भेटा आणि ठामपणे आश्वासित करा की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल, जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, अशी आठवण करुन देत त्यांनी अनिल परब यांना एसटी कर्मचाऱ्यांना भेटण्याचे आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com