PMPML कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज: सातव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

7th Pay Commission: नवीन वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे
PMPML
PMPML

PMPML Latest News: नवीन वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd.) कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. ‘पीएमपीएमएल’च्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची वाढीव वेतनाची ५० टक्के रक्कम जानेवारी २०२३ पासून दिली जाणार आहे. सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत मंगळवारी (२७ डिसेंबर) आदेश काढला जाणार आहे. पीएमपीएमएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ही माहिती दिली आहे.

शिंदे गटाचे पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत पाठपुरावा केला होता. या मागणीसाठी सोमवारी (२६ डिसेंबर) बैठकही पार पडली. बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या फरकानुसार ५० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे भानगिरे यांनी सांगितले. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि दोन्ही महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक घेऊन आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे भानगिरे यांनी सांगितले.

PMPML
Health Recruitment : प्रतिक्षा संपली! आरोग्य विभागात मेगा भरती ; तानाजी सावंताची मोठी घोषणा

याशिवाय ‘पीएमपीएमएल’च्या कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे आणि त्यासाठी जागा निश्‍चित करण्यासाठी, वैद्यकीय बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध होण्यासाठी, डेपोच्या परिसरात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात यावीत. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृहे सुरू करावीत, अशाही मागण्या यावेळी भानगिरे यांनी बैठकीत केल्या. यावर लवकर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन बकोरिया यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in