Corona Virus
Corona VirusSarkarnama

Corona in Pune : दिलासादायक बातमी! पुण्यातून कोरोना होणार लवकरच हद्दपार; सध्या केवळ १८ रुग्ण

Pune News : नगरपालिका, कँटोन्मेंट बोर्ड, झेडपी क्षेत्र कोरोनामुक्त

Pune Corona Update News : पुणे शहरासह जिल्ह्यात हाहाकार माजविणारा कोरोना विषाणू लवकरच जिल्ह्यातून हद्दपार होणार आहे. सध्या शहरासह पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे फक्त ३६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील फक्त सहा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना घरीच विलगीकरणात ठेवून उपचार सुरू आहेत.

सध्या पुणे शहर (Pune) व जिल्ह्यात मिळून एकूण केवळ ३६ सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. या एकूण रुग्णांपैकी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी १८ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सहापैकी पुणे शहरातील चार तर पिंपरी-चिंचवडमधील दोन रुग्ण आहेत. तर उर्वरित ३० रुग्ण घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. यामध्ये पुणे शहरातील १४ आणि पिंपरी चिंचवडमधील १६ रुग्णांचा समावेश आहे. (Pune Corona Update)

Corona Virus
Mantralay News : मंत्रालयातील मंत्री, अधिकारी थंडगार; कर्मचारी, जनता घामेघूम !

दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व नगरपालिका, कँटोन्मेंट बोर्ड आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी (ता. ३० मे) कोरोना रुग्णांची संख्या शून्य होती. आता ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाला असून शहरी भागातूनही लवकरच कोरोना हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यात दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झालानंतर उपचारासाठी रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हता. आता त्याच रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणारे अवघे चार रुग्ण उरले आहेत. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात फक्त १० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील सात आणि पिंपरी चिंचवडमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात आढळून आलेल्या या नवीन रुग्णांसह जिल्ह्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ झाली आहे.

Corona Virus
Jejuri Trustee Dispute : जेजुरी विश्वस्तांचा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता; ग्रामस्थ मार्गदर्शक मंडळाची स्थापना करणार

पुण्यातील कोरोना रुग्णांची स्थिती

- शहरातील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला - ९ मार्च २०२०

- कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू - ३१ मार्च २०२०

- आतापर्यंत आढळून आलेले एकूण रुग्ण - ६ लाख ९४ हजार २२९

- कोरोनातून बरे झालेले रुग्ण - ६ लाख ८४ हजार ८४८

- कोरोनाने झालेले एकूण मृत्यू - ९ हजार ४२३

- कोरोना चाचणी केलेले नागरिक - ४८ लाख ९६ हजार ९०६

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com