पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बापट-चंद्रकांत पाटील समर्थकांचे वर्चस्व

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केलेल्या १२ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस व ११ चिटणीस या पदाधिकाऱ्यांमध्ये चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. तसेच शहराध्यक्ष मुळीक, आमदार मिसाळ व खासदार संजय काकडे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली आहे
Girish Bapat and Chandrakant Patil Supporters get chance on Pune BJP Executive Committee
Girish Bapat and Chandrakant Patil Supporters get chance on Pune BJP Executive Committee

पुणे  : शहर भाजपच्या शहराध्यक्षांच्या नेमणुकीनंतर  जवळपास आठ महिने होत आले तरी शहराची नवीन कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. बुधवारी उपाध्यक्ष, सरचिटणीस व चिटणीस या तीन पदांवरील नियुक्‍त्या पक्षाने जाहीर केल्या असल्या तरी अजून अनेक पदांवरील नियुक्त्या झालेल्या नाहीत. दरम्यान, नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांवरून शहर भाजपवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांचे वर्चस्व दिसून आले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने आमदार माधुरी मिसाळ यांच्या जागी माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. मुळीक यांना शहराध्यक्षपद देऊन भाजपने प्रस्थापितांना धक्का दिल्याचे मानले जात होते. पक्षाने दीड महिन्यापूर्वी चार सरचिटणीसांची नियुक्ती करण्यात केली. त्यात बुधवारी नगरसेवक दीपक पोटे यांची भर पडली. 

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केलेल्या १२ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस व ११ चिटणीस या पदाधिकाऱ्यांमध्ये चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. तसेच शहराध्यक्ष मुळीक, आमदार मिसाळ व खासदार संजय काकडे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली आहे. मात्र, भाजप कार्यकारिणीतील इतर पदांवरील नियुक्त्या व्हायच्या आहेत. 

शहराचे नवीन पदाधिकारी
उपाध्यक्ष - हरिदास चरवड, दिनेश ऊर्फ पिंटू धाडवे, मानसी देशपांडे, भूषण तुपे, संतोष राजगुरू, योगेश बाचल, गणेश कळमकर, सुनील मारणे, श्रीपाद ढेकणे, दिलीप काळोखे, डॉ. संदीप बुटाला, रमेश काळे.
सरचिटणीस - राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे,
चिटणीस - गायत्री खडके, प्रशांत हरसुले, चंद्रकांत पोटे, किरण बारटक्के, मंगला ढेरे, कोमल शेंडकर, हरीश निकम, संदीप लोणकर, अनिता तलाठी, सुनील माने, नीलेश कोंढाळकर

उपाध्यक्ष, सरचिटणीस व चिटणीस पदांवरील पदाधिकारी जाहीर केले आहेत. इतर पदाधिकारी ही लवकरच जाहीर केले जातील.
- जगदीश मुळीक, अध्यक्ष, पुणे शहर
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com