माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक

आज दुपारी २ वाजता भरणेवाडी येथील निवासस्थानाजवळ त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
 Girijabai Vithoba Bharne
Girijabai Vithoba Bharnesarkarnama

वालचंदनगर : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरिजाबाई विठोबा भरणे (Girijabai Vithoba Bharne) (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवारी) निधन झाले आहे.

दत्तात्रय भरणे यांचे गाव इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी आहे. त्यांच्या आईंला गिरिजाबाई उर्फ जिजी या नावाने ओळखले जात होते. त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड होती. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा यांचे गेल्या दीड वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

 Girijabai Vithoba Bharne
त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री ; शिवसेनेनं डिवचलं

गिरिजाबाई यांच्या पश्चात रामचंद,आबासाहेब,मधुकर व दत्तात्रय ही चार मुले तर साळुबाई,कुसुम व हिराबाई अशा तीन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे. गिरिजाबाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून दुपारी २ वाजता भरणेवाडी येथील निवासस्थानानजिक त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com